घरमनोरंजनगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पठाण 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पठाण ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या ब्लॉक बस्टर ‘पठाण’ चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मेगा ब्लॉक बस्टर चित्रपट ठरला आहे. दरम्यान, आता ‘पठाण’च्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.

पठाण ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

शाहरुख खानचा चित्रपट 22 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. प्राइम व्हिडिओने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. ‘पठाण’ प्राइम व्हिडिओवर 22 मार्च रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

‘पठाण’ने चित्रपटाने रचला इतिहास

‘पठाण’ चित्रपट भारतातील 800 आणि जगातील 20 देशांमधील 135 चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. या चित्रपटाने देशात जवळपास 549 कोटींची कमाई केली असून चित्रपटाने जगभरात 1049 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यातील बेशरम रंग या गाण्यावरून अनेक राज्यांमध्ये अनेक वाद रंगले होते.

दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तसेच या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ देखील आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

फक्त जीम करुन बाॅडी बनवतात, अभिनयाच्या नावाने मात्र शंख; रत्ना पाठकांनी नव्या कलाकारांना सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -