घरमनोरंजनपंतप्रधानांकडून 5 भाषांमध्ये 'केसरिया' गाणं गाणाऱ्या गायकाचं कौतुक

पंतप्रधानांकडून 5 भाषांमध्ये ‘केसरिया’ गाणं गाणाऱ्या गायकाचं कौतुक

Subscribe

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटातील गाणी प्रचंड हिट झाली. या चित्रपटातील ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय ठरलं. दरम्यान, अशातच आता हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ हे गाणं एका व्यक्तीने 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये गायलं आहे. अनेकांनी या व्यक्तीचं कौतुक शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान मोदींकडून गायकाचे कौतुक

गायक स्नेहदीप सिंगने ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ हे गाणं एक नाही तर 5 भाषांमध्ये गायलं आहे. स्नेहदीप ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ हे गाणे मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये गायल्यामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. सध्या त्याच्या गाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्नेहदीपचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर स्नेहदीप सिंगचा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की, “हा अप्रतिम परफॉर्मन्स पाहिला. स्नेहदीप सिंगच्या सुरेल आवाजाशिवाय, एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेची ती उत्तम अभिव्यक्ती आहे. अप्रतिम!” पीएम मोदींच्या ट्विटनंतर स्नेहदीप चर्चेत आला आहे. गायकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, स्नेहदीप सिंग यांचा हा व्हिडिओ शेअर करून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्यांचे कौतुक केले नाही, तर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्याचा हा व्हिडीओ रिट्वीट करत कौतुक केलं आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -