कंगना जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा…विक्रम गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्मात्याचा निर्णय

जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो....

vikram gokhale Explanation in his comment kangana right about india freedom in 2014
गोखलेंचं पुराण!

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. काहींनी तिच्या या वक्तव्याचं समर्थन केलंय तर काही जणांकडून टीकेची झड उठवण्यात येत आहे. कंगनाच्या वक्तव्याला मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पाठींबा दिला आहे. गोखलेंनी अभिनेत्री कंगनाला पाठींबा दिल्यानंतर मराठी अभिनेत्री, अभिनेता आणि निर्मात्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. ज्येष्ठता आणि शहाणपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारचं ट्विट करत अभिनेता अतुल कुलकर्णीने विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, कंगना जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा असल्याचं मराठी सिनेनिर्माते निलेश नवलाखा यांनी विक्रम गोखले यांच्यासोबत काम न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मी विक्रम गोखले बरोबर काम केले आहे, कलाकार म्हणुन मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना रानावत जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्या बरोबर काम करणार नाही हे पण घोषीत करतो. अशा प्रकारचं ट्विट निलेश नवलखा यांनी केलं आहे.

१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले. असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने एका मुलाखतीत केलं होतं. तिच्या विधानानंतर चहूबाजूंनी टीका होत होती. मात्र, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तिच्या वक्तव्याचं समर्थ केलं होतं. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय नवलखा यांनी घेतला आहे.

विक्रम गोखले नक्की काय म्हणाले ?

ब्राह्मण महासंघातर्फे अमृत महोत्सवानिमित्त गोखले यंचा सन्मान करण्यात आला होता. परंतु माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत कंगना जे काही बोलली ते खरं आहे. मी तिच्या विधानाचं समर्थन करतो. असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं.