घरमनोरंजन'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेतील अदिती जलतारेने जाणले वटपौर्णिमेचे महत्त्व

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेतील अदिती जलतारेने जाणले वटपौर्णिमेचे महत्त्व

Subscribe

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या भव्य मालिकेत अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र मांडले आहे. अहिल्याबाई होळकर एक अशी स्त्री होत्या ज्यांच्यात स्त्रीचे सामर्थ्य आणि धैर्य एकवटले होते. त्यांनी १८ व्या शतकात सर्व प्रतिकूलतांवर मात करून केवळ इतिहास घडवला नाही तर येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्रोत बनल्या. बरेचसे अभिनेते ते जे पात्र साकारत असतात यांना आलेल्या अनुभवांसारखेच अनुभव आपणही घेण्याचा प्रयत्न करतात, जेणे करून पडद्यावरचा त्यांचा अभिनय अस्सल वाटावा. पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेतील अभिनेते हे वारंवार सांगत असतात की, या मालिकेने त्यांचे आयुष्यच पालटून टाकले आहे आणि या मालिकेने अत्यंत मौलिक शिकवण त्यांना दिली आहे.

कलाकारांची आपल्या भूमिकेसाठी तयारी करण्याची आपापली खास पद्धत असते. या मालिकेत अहिल्याबाई होळकरांची बालपणीची भूमिका करत असलेल्या अदिती जलतारेने देखील ही व्यक्तिरेखा व्यवस्थित समजून घेण्यासाठी विशेष खटपट केली आहे. वट पौर्णिमेच्या एका महत्त्वाच्या भागात अदितीने केवळ ती दृश्ये चित्रित केली नाहीत तर, वट पौर्णिमेचे महत्त्व आणि त्याची लक्षणीयता समजून घेण्याचाही प्रयत्न केला. सेटवर ती सगळ्यात लहान असली तरी आपल्या काम करण्याच्या निष्ठेने आणि गोष्टी समजून घेण्याच्या आपल्या जिज्ञासू वृत्तीने ती सगळ्यांना चकित करते.

- Advertisement -

याविषयी अधिक बोलताना अदिती जलतारे म्हणाली, “त्या व्यक्तिरेखेला पूर्ण क्षमतेने सर्व काही देण्याची माझी इच्छा असते, त्यामुळे त्यासाठी खूप खटाटोप करायलाही मी तयार असते. आणि मला वाटते, प्रेक्षकांनी मला खूप खुल्या दिलाने स्वीकारले आहे, तर हे मी त्यांचे देणे लागते. या मालिकेतून मी खूप काही शिकले आहे आणि दररोज एक नवी शिकवण मला मिळते. आम्ही जेव्हा वट पौर्णिमेच्या दृश्याचे शूटिंग करत होतो, तेव्हा मला असे वाटले की, जर मला वट पौर्णिमेचे महत्त्व माहीत असेल, तर मी त्या दृश्याला अधिक चांगला न्याय देऊ शकेन. मी भूतकाळातही बर्‍याच मराठी बायकांना वट पौर्णिमेचे व्रत करताना पहिले आहे. पण मला त्याबद्दल माहिती नव्हती. सेटवरच्या सगळ्या मंडळींनी मला वट पौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले, त्याबद्दल मी त्या सर्वांची ऋणी आहे.”


कलियुगातल स्वयंवर, धनुष्य तोडून वधूच्या गळ्यात घातली वरमाला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -