घरमनोरंजनराजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या 'Anand' चित्रपटाचा Remake; लवकरच स्टारकास्टवरून पडदा पडणार

राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या ‘Anand’ चित्रपटाचा Remake; लवकरच स्टारकास्टवरून पडदा पडणार

Subscribe

‘बाबू मोशाय जिंदगी बडी होनी है लंबी नहीं’ हा 1971 मध्ये आलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट संवाद तुम्हाला आठवतचं असेल. या चित्रपटाने आजवर लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. अशात प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे की, लवकरचं आनंद चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरु होत आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ‘आनंद’च्या रिमेकची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, ‘आनंद’च्या रिमेकच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची जागा कोण घेणार याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. समीर राज सिप्पी आणि विक्रम खाखर निर्मित या चित्रपटाच्या रिमेकबाबतचे उर्वरित खुलासे लवकरच होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

- Advertisement -

दरम्यान आनंद चित्रपटात राजेश खन्ना एका कॅन्सर पेशंटच्या भूमिकेत दिसले होते. मृत्यूच्या भीतीने नव्हे, तर चित्रपटात तो मोठ्या उत्साहात दिसले. त्याचवेळी अमिताभ बच्चन यांनी ‘आनंद’ चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली होती. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. ‘आनंद’ने त्या काळात बॉक्स ऑफिसवर 0.98 कोटींचा व्यवसाय करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

- Advertisement -

‘आनंद’ चित्रपटातील राजेश खन्ना यांचा अभिनय आणि चित्रपटातील संवाद आजही स्मरणात आहेत. या चित्रपटातील दमदार संवाद गुलजार यांनी लिहिले होते, जे आजही सुपर हिट आहेत. या चित्रपटातील उत्कृष्ट संवाद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अपवादात्मक अभिनयासाठी देखील ओळखले जातात. या चित्रपटाचे सर्व संवाद गुलजार यांनी लिहिले आहेत. ‘बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं।’ ‘मौत तो एक पल है..।’ ‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं।’ ‘ये भी तो नहीं कह सकता कि मेरी उम्र तुझे लग जाए।’ ‘ हे संवाद अजूनही लोकांच्या जिभेवर आहेत.


जिंकलंत टाटा! बॉडीगार्डशिवाय चक्क नॅनोमधून रतन टाटा ‘ताज’मध्ये पोहोचले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -