राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचे ठोके मंदावले; प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांकडून माहिती

राजू श्रीवास्तव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले. परंतु त्यांना अजूनही शुद्ध आलेली नाही. त्यांच्या हृदयाचे ठोके हळूहळू मंदावत आहेत. तसेच त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झालेली आहे. ज्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही.

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडली असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांवर दिल्ली हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. मागील काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करता करता हृदय विकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. या वेळी त्यांच्या डोक्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली. दरम्यान, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा एकदा खराब झाली आहे. ते सध्या खूप नाजूक स्थिती मध्ये आहेत. ते अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहेत.

राजू श्रीवास्तव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले. परंतु त्यांना अजूनही शुद्ध आलेली नाही. त्यांच्या हृदयाचे ठोके हळूहळू मंदावत आहेत. तसेच त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झालेली आहे. ज्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही.

वर्कआउट करताना आला होता हृदयविकाराचा झटका
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जीममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर एक्सरसाईज करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि ते खाली पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव पक्षातील काही मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे आले होते. सकाळी ते जीम करण्यासाठी हॉटेलच्या जीममध्ये गेले. त्यावेळी वर्कआउट करता करता त्यांना हृदय विकाराचा झटका आला.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ कार्यक्रमाने मिळाली ओळख

राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ या कार्यक्रमाने राजू श्रीवास्तव यांना ओळख दिली.


हेही वाचा :जेव्हा तुमचा चित्रपट ईमानदार असतो, तेव्हा तो यशस्वी होतोच…विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत