घरमनोरंजनकपूर घराण्यात संपत्तीवरुन वाद, राजीव कपूरयांच्या संपत्तीसाठी रणधीर-रिमाची कोर्टात याचिका दाखल

कपूर घराण्यात संपत्तीवरुन वाद, राजीव कपूरयांच्या संपत्तीसाठी रणधीर-रिमाची कोर्टात याचिका दाखल

Subscribe

दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील सगळ्यात प्रसिद्ध अससलेल्या कपूर घराण्याची जादू जगजाहीर आहे. कपूर घराण्यात गेल्या काही महिन्यांत दुखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घराण्यातील तीन जणांनी वर्षभरात या जगाचा निरोप घेतला आहे. मागील वर्षी जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. अलीकडेच त्यांचे बंधू राजीव कपूर यांचे ही निधन झाले. ऋषी आणि राजीव यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर अद्याप या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. कपूर घराण्याच्या या पिढीत रणधीर कपूर आणि बहिण रीमा जैन हे दोघेच हयात आहेत. दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे. त्यानंतर हायकोर्टाने या दोघांना राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचे पेपर्स कोर्टात जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

 राजीव कपूर यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही आहे. राजीव यांचे आरती सबरवाल यांच्याशी लग्न झाले होते. मात्र एकमेकांमधील मतभेदांमुळे २००३ मध्ये ते दोघे वेगळे झाले. दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी कधीच एकत्र पाहिले गेले नव्हते. रणधीर कपूर आणि रीमा जैन यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, आता ते दोघेच राजीव कपूर यांच्या मालमत्तेचे वारस आहेत. या सुनावणीत हायकोर्टाने या दोघांनाही राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचा पुरावा आणण्यास सांगितले आहे. रणधीर आणि रीमा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी सुनावणी केली आर्हे. त्यांच्याकडे राजीव यांच्या घटस्फोटाचे पेपर्स नाहीत. परंतु ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ती सापडली नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांना हे पेपर्स सादर करण्यामध्ये मुभा द्यावी अशी विनंती केली. या दोघांचा घटस्फोट मुंबई कोर्टात झाला की दिल्ली कोर्टात याचीही माहिती या दोघांना नसल्याचेही वकिलांनी कोर्टात सांगितले.

- Advertisement -

हे वाचा- शेफाली शाहने स्वरचित कवितेतून उलगडली ”अजीब दास्तां”मधली आपली व्यक्तिरेखा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -