Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन तापसीच्या लूकवर रंगोली चंदेलने पुन्हा ऊडवली खिल्ली,म्हणाली कंगनाची स्वस्त कॉपी

तापसीच्या लूकवर रंगोली चंदेलने पुन्हा ऊडवली खिल्ली,म्हणाली कंगनाची स्वस्त कॉपी

. एवढं सगळ केल्यावर बोलते की मला कंगनाची स्वस्त कॉपी बोलण्यात आले." रंगोलीच्या या वक्यव्यावर तापसीने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाहीये.

Related Story

- Advertisement -

कलाकारांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये क्वचितच त्यांची हौस पुर्ण करण्याचा मनमोकळेपणाने फिरण्याचा आनंद घेता येतो. पण सध्या बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू रशियाच्या भटकंतीमध्ये भारीच गूंग झाल्याचे दिसतेय. ते सुद्दा चक्क साडी नेसून तापसी रशियातील रस्तावर मौज करत आहेत. तापसीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या तिच्या रशिया ट्रीपचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. परदेशात असताना सुद्दा तापसीने भारतीय पोषाखाला पसंती दिल्याचे तिच्या फोटोतून दिसतेय. तापसीने पांढऱ्या रंगाची कॉटन साडी परिधान कोलीये तसेच यावर तिने शूज आणि गॉगल्स लावला आहे तापसीचा हा हटके लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या बहिणीने तापसीच्या या लूकवर आपल्या बहीणीची स्वस्त कॉपी असे वक्तव्य करत तापसीला टोला लगावला आहे. रंगोली चंदेल सोशल मीडीयावर प्रचंड सक्रीय असते. रंगोली नेहमीच तापसीच्या लूकवर कमेंट करत तिच्यावर निशणा साधते. यावेळेस सुद्धा रंगोलीने तापसीच्या नव्या फोटोवर वक्तव्य करत तापसीला खडेबोल सुनावले आहेत.


रंगोली चंदेलने इंस्टाग्राम अकाउंटवर कंगना रनौतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.या फोटोमध्ये कंगना वेगवेळे लूक कॅरी करताना दिसत आहे. यासोबत रंगोलीने तापसी पन्नूच्या रूस ट्रीपचा एक फोटो शेअर करत लिहले आहे की ‘कंगना सर्वांसाठी एक उत्तम स्टाईल आयकॉन आहे. तिचा फक्त एकच ऊद्देश आहे की लोकांना साडी खालण्यास प्रेरीत करने तसेच आपल्या हैंडलूम उद्योगाला पुनर्जीवित करणे.कंगना प्रत्येक गोष्ट गहन विचार करुन करते. आणि तुमच्याकडे स्वत:चं स्वतंत्र टॅलेंट नाहीये तुम्ही फक्त एक भयानक, फॅन सारखे कंगनाच्या स्टइल,लूक,कपड्यांची कॉपी करतात.आणि फोटो पोस्ट करुन बोलतात की मी साडीला कूल बनवले आहे. काही जास्तच झाले आहे आता. एवढं सगळ केल्यावर बोलते की मला कंगनाची स्वस्त कॉपी बोलण्यात आले.” रंगोलीच्या या वक्यव्यावर तापसीने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाहीये. तपसी रंगोलीच्या या वक्तव्याचे कशा प्रकारे उत्तर देते हे पाहणे रंजक ठरणार आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – रशियाच्या रस्त्यावर तापसीची भटकंती..साडी,शूज,गॉगल्समध्ये तापसीचा सफरनामा


 

- Advertisement -