घरमहाराष्ट्र...मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

…मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Subscribe

मुंबई – आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी कधीही गंद्दारी केली नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले. असंगांशी संग करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, असे म्हणत त्यांनी तुम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवले आणि जेलमध्ये टाकले, असा उद्धव ठाकरें आणि विरोधी पक्षांना लगावला.

गेल्या वर्षी 24 ऑगस्टला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशंब्द काढले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या घटनेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला आमि उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षावर टीका केली.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे तीसऱ्या रांगेवरून विरोधकांना उत्तर –

यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत तिसऱ्या रांगेत उभे करण्यावरून विरोधक करत असलेल्या टीकेला उत्तर दिले. नीती आयोगाच्या बैठकीला गेलो होतो. त्यावेळी मी त्या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले. मात्र, मी मागे तिसऱ्या रांगेत उभा होतो त्यावरुन विरोधकांनी टीका केली. पण रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचे आहे. मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत होतो. त्याबद्दल कोणी काही बोललो नाही. इंदिरा गांधींचा मी फॅन होतो, त्यांनी डॅशिंग काम केले. त्याप्रमाणे आताच्या पंतप्रधानांनी देशाचा डंका जगभरात बजावला. अशा माणसाला भेटायला जायचे तर रांग का बघायची?

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -