घरताज्या घडामोडीखऱ्या आयुष्यात 'ही' अभिनेत्री आहे जूही चावलाची जाऊबाई

खऱ्या आयुष्यात ‘ही’ अभिनेत्री आहे जूही चावलाची जाऊबाई

Subscribe

मधू नुकतीच 'थलायवी' या सिनेमात दिसली होती

सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये दररोज बॉलिवूडमधील अनेक कलाकार येत असतात. यावेळी अभिनेत्री जूही चावला (Juhi Chawla)  आणि रोझा फेम अभिनेत्री मधू आयशा जुल्का (Madhu) या अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. यावेळी दोघींनी भरभरुन गप्पा मारल्या. दरम्यान दोघी खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या नातेवाईक असल्याचा खुलासा करण्यात आला. अभिनेत्री जूही चावला आणि मदू आयशा खऱ्या आयुष्यात सख्या जाऊबाई आहेत. दोघींच्या या खुलाशानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

- Advertisement -

कपिल शर्मा शोमध्ये अभिनेत्री जूही चावला हिने त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला ती म्हणाली, मधू माझी जाऊ आहे. माझ्यात आणि तिच्यात जेठाणी आणि देवरानीचे नाते आहे. आमच्या नात्याविषयी ही बाब आमच्या फार कमी फॅन्सना माहिती आहे.

- Advertisement -

जूही चावलाने जय मेहता सोबत १९९६मध्ये विवाह केला. जय मेहता हा पेशाने बिझनेस मॅन आहे. जूहीला दोन मुले देखील आहेत. जय मेहताचा भाऊ आनंद शाह याच्याशी अभिनेत्री मधू हिचा विवाह झाला आणि दोन अभिनेत्री खऱ्या आयुष्यात देवरानी जेठाणी झाल्या. त्याचप्रमाणे मधू ही अभिनेत्री हेमा मालिनी यांची देखील नातलग आहे. मधूच्या वर्कफ्रंटविषयी पाहिले तर मधू नुकतीच ‘थलायवी’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात ती वीएन जानकी रामाचंद्रन यांच्या भूमिकेत दिसली होती.

जूही चावला ही नव्वदच्या दशकातील सर्वात सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘डर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘यस बॉस’, ‘इश्क’ यांसारखे हिट सिनेमे जूहीच्या नावावर आहेत. तर अभिनेत्री मधू देखील रोजा या प्रसिद्ध सिनेमात दिसली होती. रोजाप्रमाणेच ‘फूल और काटे’ आणि ‘दिलजले’ या सिनेमातीही तिने काम केले आहे.


हेही वाचा – राखी सावंत झाली चिंपांझी माकड, पाहा Video

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -