घरमनोरंजनऋतुराजच्या दमदार खेळीने चाहत्यांना आली सायली संजीवची आठवण

ऋतुराजच्या दमदार खेळीने चाहत्यांना आली सायली संजीवची आठवण

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. ऋतुराज उघडपणे सायलीवर प्रेम दाखवत असला तरी सायलीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आयपील हंगाम सुरु झाल्यापासून ऋतुराजची दमदार खेळी पाहून नेटकऱ्यांनी सायली संजीवच्या पोस्टवर कमेंट्स करण्यास सुरु केल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये आता त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

यंदाच्या आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगच्या १४ व्या पर्वात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. कोलकत्ताविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऋतुराजने २७ चेंडूत ३२ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. यानंतर सायली संजवीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

- Advertisement -

सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा एक सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. काहींनी ऋतुराजवरुन कमेंट करत लिहिले की, ‘काल तुमच्या ह्यांनी ट्रॉफी जिंकली’. तर दुसऱ्या एका युजरने ‘ऋतु का राज’ असे म्हटले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.


’चला हवा येऊ द्या’ शोला कृष्णा घोंगेचा रामराम

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -