रिंकूने 2016 मध्ये सैराट या मराठी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. सैराटचा रिमेक असलेल्या मनसु मल्लिगे (2017) या चित्रपटाद्वारे तिने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने 2019 मध्ये बॉलीवूड चित्रपट झुंड मध्ये देखील अभिनय केला. रिंकू मराठी, कन्नड आणि हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते. सैराटच्या वेळी रिंकू अतिशय लहान होती. रिंकू आता बऱ्यापैकी मोठी झाली आहे. पण सैराटनंतर तिचं वजन बरंच वाढलं होतं. रिंकूने एका मुलाखतीमध्ये 20 किलो कमी केल्याचं रहस्य शेअर केले होते. त्यामुळे रिंकूच्या पर्सनॅलिटीमध्येही खूप बदल झाला आहे. त्यामुळे रिंकूचं डाएट आणि तिची लाईफस्टाईल कशी आहे? याबाबत लोकांना उत्सुकता असते. तिच्याबाबत जाणून घ्यायला लोकांना आवडतं.
रिंकूच्या फिटनेसचं रहस्य
रिंकूने कोणताही ट्रेनर लावला नव्हता. रिंकूला तिच्या आईने वजन कमी करण्यास मदत केली, असे रिंकूने सांगितले. रिंकूच्या आईनेच तिच्या खाण्यापिण्याची आणि व्यायामाची काळजी घेतली. तिच्या आईने तिला प्रत्येक गोष्टीत मदत केल्याचं तिने सांगितले. केवळ दोन महिन्यात तिने तब्बल 20 किलो वजन कमी केले. तसंच रिंकूने स्ट्रिक्ट डाएट फॉलो केल्यानेच आज ती स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत असल्याचंही तिने सांगितलं आहे.
रिंकू राजगुरू वर्कआउट रूटीन
रिंकू राजगुरू नेहमीच तिच्या बॉडीवर काम करत असते. ती प्रत्यक्षात तिच्या उंचीमुळे पातळ दिसते. तिला मुख्यतः तिच्या पायांवर लक्ष केंद्रित करते. तिला डान्स करायलाही आवडते आणि आठवड्यातून 2-3 वेळा तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये डान्स करते.
रिंकू राजगुरूचा डायट प्लॅन
घरी गेले तर आधीचे दोन दिवस मी खूप खाते. हे खायचंय ते खायचंय… पण नंतर मी घरी खूप कमी खाते. एखादा पदार्थ आवडला तर त्याचा एखादा घासही मला बास होतो. सकाळी नाश्ता करते. दुपारी मग जीमला जाते. मग ताक वगैरे पिते. संध्याकाळी काकडी गाजर वगैरे खाते. बाहेरचं फार काही खायला आवडत नाही, असं रिंकूने सांगितलं.