सलमान खान आता फूड इंडस्ट्रीत,मुंबईत उभारणार 19 मजली हॉटेल

बॉलिवूड मधील अभिनेता सलमान खान याची चर्चा नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन होत असते. अशातच सलमान खान मुंबईत आता आपले एक अत्याधुनिक सुविधा असलेले हॉटेल उभारणार आहे. हे हॉटेल १९ मजल्याचे असून वांद्रे येथे उभारले जाणार असल्याची चर्चा आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार सलमान खान वांद्रे येथील कार्टर रोडवर एक हॉटेल उभारत आहे. या हॉटेलमधून मस्त समुद्राचा व्यू पाहता येणार आहे. महापालिकेने सलमान या हॉटेलसाठी मान्यता दिली आहे. खरंतर सलमान ज्या ठिकाणी हॉटेल उभारत आहे तेथे घर बांधणार होता. मात्र आता त्याच ठिकाणी हॉटेल बांधणार आहे. जवळजवळ एका वर्षाआधी सलमान खानची आई समला खान हिच्या नावे हॉटेलचे प्रपोजल जमा करण्यात आले होते.

खान यांच्याकडून आर्किटेक्ट Sapre & Associates ने जो प्लॅन दिला होता त्यानुसार ही हॉटेलची इमारत 69.90 मीटर असणार आहे. ज्यामध्ये 3 लेव्हल बेसमेंट, पहिला आणि दुसरा मजला कॅफे-रेस्टॉरंट, तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल आणि चौथा मजल्यावर फ्लोर सर्विस असणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कंवेन्शन सेंटर, ७ व्या ते १९ व्या मजल्यापर्यंत हॉटेल असणार आहे. सलमानच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास तर तो टायगर 3 मध्ये दिसून येणार आहे.


हेही वाचा- सलमान खानने OTT बरोबर केली 5 वर्षांची डील