प्रमोशनसाठी सारा आणि विक्की पोहोचले राजस्थानात; घेतला चुलीवरच्या भाजी-भाकरीचा आस्वाद

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतेच विक्की आणि सारा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजस्थात पोहचले होते. जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळचे अनेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात विक्की आणि सारा राजस्थानातील लोकांसोबत देसी रंगात रंगून गेले आहेत

नुकत्याच काही वेळापूर्वी विक्कीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन राजस्थान ट्रिपदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ‘पधारो म्हारे देस’ असं म्हणत येथील लोक त्यांचे स्वागत करत आहेत. शिवाय विक्कीने या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये तो आणि सारा 170 लोकांच्या संयुक्त कुटुंबाला भेटले. असं लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये विक्की आणि सारा चुलीवरच्या भाकरीचा आस्वाद घेत आहेत. यात विक्कीने डोक्यावर राजस्थानी पगडी घातलेली दिसत आहे. तर साराने देखील सिंपल लूक केला होता.

राजमंदिर सिनेमात होणार नवीन गाणं लाँच

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

राजस्थानमध्ये कुटुंबाला भेटण्यापूर्वी , विक्की कौशलने आणखी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो आणि सारा अली खान त्यांचे नवीन गाणे ‘तेरे वास्ते’ लाँच करण्यासाठी जयपूरला पोहोचले. हा व्हिडिओ शेअर करताना विकी कौशलने लिहिले की, “आमचे नवीन गाणे ‘तेरे वास्ते’ लॉन्च होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही , म्हणून आम्ही जयपूरला आलो आहोत. उद्या आम्ही तुम्हाला राजमंदिर सिनेमात भेटू.” सारा अली खान आणि विकी कौशल स्टारर चित्रपट 2 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

 


हेही वाचा :

सुष्मिता सेन नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री होती ‘आर्या’साठी दिग्दर्शकांची पहिली पंसती