घरमनोरंजनशाहरुखने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार; नंबर प्लेटने वेधलं लक्ष

शाहरुखने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार; नंबर प्लेटने वेधलं लक्ष

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागील अनेक दिवसांपासून त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली असून जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली. आगामी काळात शाहरुख जवान आणि डंकी या चित्रपटात झळकणार आहे. अशातच, आता शाहरुखने स्वतःसाठी महागडी रोल्स रॉयस ही कार घेतली आहे. या कारची किंमत करोडोंच्या घरात असून रविवारी रात्री शाहरुखला या कारसोबत पहिल्यांदा पाहण्यात आलं. ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने खरेदी केलेली कार सध्या भारतातील सर्वात महागडी एसयूव्ही आहे. या गाडीची किंमत अंदाजे 8.20 कोटी असून याचा एकूण खर्च 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुखची ‘555’ नंबर प्लेट असलेली पांढऱ्या रंगाची आलिशान कार मन्नत बंगल्याकडे जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आत्तापर्यंत शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणमध्ये शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसत आहेत. तर डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर टायगरच्या रुपात सलमान खानचा कॅमिओ देखील आहे.


हेही वाचा :

शोमध्ये माधुरी दीक्षितवर आक्षेपार्ह टिप्पणी; नेटफ्लिक्सला पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -