घरमनोरंजनपरवानगीशिवाय गाणं प्रदर्शित केल्यास कारवाई करू, सिद्धूच्या कुटुंबियांकडून निर्मात्यांना सूचना

परवानगीशिवाय गाणं प्रदर्शित केल्यास कारवाई करू, सिद्धूच्या कुटुंबियांकडून निर्मात्यांना सूचना

Subscribe

गायक सिद्धूचं कोणतंही गाणं (Songs) परवानगीशिवाय प्रदर्शित केल्यास कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात येईल असा इशारा त्याच्या आई-वडिलांनी दिला आहे.

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Singer Siddhu Moosewala Murdered) याची २९ मे रोजी हत्या करण्यात आली. या घटनेमुळे त्याच्या फॅन्सना जबर धक्का बसला आहे. तर, दुसरीकडे आपल्या एकुलत्या एका मुलाला गमावल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनीही प्रचंड शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, गायक सिद्धूचं कोणतंही गाणं (Songs) परवानगीशिवाय प्रदर्शित केल्यास कायदेशीर कारवाई (Legal Action)करण्यात येईल असा इशारा त्याच्या आई-वडिलांनी दिला आहे.

सिद्धू मूसेवाला याच्या टीमकडून त्याच्या इस्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Story) एक सूचना जाहीर करण्यात आली आहे. या सूचनेनुसार, सिद्धूची कोणतीही गाणी परवानगीशिवाय प्रदर्शित केल्यास किंवा लिक केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

इस्टाग्राम पोस्टनुसार, “सिद्धूने याआधी ज्या निर्मात्यांसोबत काम केलं आहे त्यांना विनंती आहे की, त्याची पूर्ण किंवा अपूर्ण ट्रॅक्स प्रदर्शित करू नये. जर त्याचं कोणतंही काम लिक झाल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याची सर्व कामे सिद्धूच्या दशविधी कार्यानंतर म्हणजेच ८ जूननंतर सिद्धूच्या वडिलांकडे सोपवावित. सिद्धूच्या इतर कोणत्याही नातेवाईक किंवा मित्र परिवाराने संगीत निर्मात्यांकडे संपर्क साधल्यास कोणीही त्यांना प्रत्युत्तर देऊ नये. सिद्धूच्या वडिलांकडेच त्याच्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.”

- Advertisement -

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मूसेवाला याच्यावर रविवारी २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला. सिद्धू आणि त्याच्या दोन साथीदारांवर तब्बल ३० राऊंड गोळीबार (Firing) करण्यात आला होता. या तिघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात सिद्धुला मृत घोषित करण्यात आलं.

कॅनडा येथील गोल्डी ब्रार (Goldy brar) याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गोल्डी ब्रार हा पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (lawrence bishnoi) याचा साथीदार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -