घरमनोरंजनआयकर विभागाच्या छापेमारीवर तापसीचे ट्वीट; म्हणाली, 'इतनी सस्ती नहीं...'

आयकर विभागाच्या छापेमारीवर तापसीचे ट्वीट; म्हणाली, ‘इतनी सस्ती नहीं…’

Subscribe

अभिनेत्री तापसी पन्नूने या आयकर विभागाच्या कारवाईवरील आपले सोडले मौन

आयकर विभागाकडून बॉलिवूड मंडळींवर कारवाई करण्यात आली आहे. कर चुकवल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नूने या आयकर विभागाच्या कारवाईवरील आपले मौन सोडले असून एका ट्विटद्वारे तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपावर उत्तर देताना ती असं म्हणाली की,आता मी स्वस्त राहिली नाही.

दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू तपास यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचा हिशेब देण्यास असमर्थ असल्याचे आयकर विभागने म्हटले आहे. आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसले. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे तापसी आणि तिचे कुटुंबीय नाराज असून तापसीने तीन ट्वीट करून आपली बाजू माडण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

पहिल्या ट्वीटमध्ये तापसीने असे लिहिले की, “उन्हाळ्याच्या सुट्ट्या येत असल्याने पॅरिसमध्ये बंगला खरेदी करण्याचा सर्वात मोठा आरोप माझ्यावर झाला आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये तापसीने लिहिले की, “माझ्यावर भविष्य घडवण्यासाठी ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारण मी यापूर्वी पैसे घेण्यास नकार दिला होता.” तर तिसऱ्या आणि शेवटच्या ट्वीटमध्ये तापसी असं म्हणाली, “आमच्या सन्माननीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 च्या छापाच्या आठवणी ताज्या झाल्या ज्या माझ्यासोबत घडल्या. पुढे तापसीने म्हटलं की, “आता मी स्वस्त राहिली नाही.” कंगनाने सुरुवातीच्या वादादरम्यान तापसीला ‘सस्ती कॉपी’ म्हटलं होतं.

- Advertisement -

तापसी अनुराग प्रकरणामध्ये अर्थमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

बॉलिवूड मधील काही कलाकारांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर देशात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यावर भाष्य केले आहे. आमचे सरकार असताना अशा कारवाई केल्या त्यावर सर्वांनी टिका केली, अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र अशा चौकशी २०१३ सालीही कलाकारांची करण्यात आली होती. मात्र तेव्हा कोणी प्रश्न विचारले नाहीत. आताच का बोंब उठवली जातेय, असे सडेतोड उत्तर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -