घरमनोरंजनती डॉक्टर माझी फॅन होती, तिच्या मृत्यूमुळे मला धक्का बसलाय- कंगणा रणावत

ती डॉक्टर माझी फॅन होती, तिच्या मृत्यूमुळे मला धक्का बसलाय- कंगणा रणावत

Subscribe

पर्यटकांनी सध्या अनेक निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्यास सुरूवात केली आहे. याचदरम्यान पर्यटनाचा आनंद घेत असताना हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किन्नौर येथील बटसेरी येथे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर गखमी झालेत. दरड कोसळून मृत्यू झालेले ९ लोक हे पर्यटक असून ते छत्तीसगड येथील होती अशी माहिती समोर येतेय. एकूण १२ प्रवासी होते त्यातील ९ जणांचा मृत्यू झालाय. ३ जखमींमध्ये बटसेरा येथील काही नागरिक आहेत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे भूस्खलन होऊन मोठी हानी झालीय. या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त करत ट्विट केलं होतं. तसेच अभिनेत्री कंगणा रणावतने देखील किन्नौर दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या व्यक्तीमध्ये कंगणा रणावतची चाहती डॉ.दीपा शर्मा हीचा देखील मृत्यू झाल्याने कंगणाने अत्यंत भावनीक इंन्टा स्टोरी पोस्ट करत लिहले आहे की,” डॉ दीपा एका माझी चाहती होती. दीपाने अनेकदा मझ्यासाठी फूलं,भेटवस्तू,मिठाई,पत्र लिहून पाठवली होती. तसेच ती माझ्या मनाली येथील घरी सुद्धा आली होती. खूप धक्कादायक आहे. तसेच ही घटना दु:ख व्यक्त करण्यापलीकडे आहे.

 

- Advertisement -

कंगणा पुढे म्हणाली, “जयपुरमध्ये मणिकर्णिका शूटींग दरम्यान आमची भेट झाली होती. अनेक फॅन्स माझी वाट पाहत होते. मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही,पण दीपाने मला पाहीले व जोरात ओरडली आणि माला येऊन मिठी मारली.त्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो.पण आजचा दिवस खूप भयानक आहे.” कंगणाने केलेल्या या पोस्टमुळे अनेक चाहते देखील भावूक झाले आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – अनुराग कश्यपला शारीरिक संबधासारखे बोल्ड प्रश्न विचारताच आलिया कश्यप झाली ट्रोल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -