घरमनोरंजनआगामी रोमँटिक शो 'तेरी मेरी डोरियां'चा टीझर झाला प्रदर्शित

आगामी रोमँटिक शो ‘तेरी मेरी डोरियां’चा टीझर झाला प्रदर्शित

Subscribe

टेलिव्हिजन नेहमीच आपल्या अनोख्या कथा दर्शकांसमोर आणण्यात अग्रेसर आहे. तसेच, त्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. अशीच एक कथा ज्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे ती म्हणजे ‘गुम है किसी के प्यार में’ जी गुंतागुंतीच्या प्रेमाविषयी आहे. स्टारप्लसच्या या मालिकेला तसेच मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अलीकडेच, या शोचे कलाकार- साई, विराट आणि पाखी यांनी 6 पात्रांसह एका नवीन कथेची पहिली झलक सादर केली आहे. अशी कहाणी जी नियतीच्या ट्विस्टमध्ये एकमेकांसोबत गुंतत जाते आणि प्रेक्षकांना ‘कोणाचे धागे जुळणार कोणासोबत… कोणासोबत बनणार कोणाची जोडी?’ या उत्कंठावर्धक प्रश्नांवर आणून ठेवते.

पंजाबमध्ये सेट, टीझर व्हिडिओमध्ये मेल लीडला त्याची पगडी धारण करण्यापासून ते स्टाईलमध्ये त्याची बाइक चालवण्यापर्यंत तसेच फिमेल लीडला तिची मातीकाम कौशल्य दाखवत पाहायला मिळते. अशातच, ‘गुम है किसी के प्यार में’च्या मुख्य कलाकारांनी कथेचे नरेशन केले असून, गुंतागुंतीच्या जगात प्रेम शोधण्याचा त्यांचा दृष्टीकोन सादर करतात. हे ६ पात्र कोण आहेत, काय असेल त्यांचा प्रवास, आणि त्यांना प्रेम मिळेल का? त्यांचे जीवन कसे गुंफले जाईल?.. प्रेमाच्या या शोधात त्यांना कोणत्या अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागेल? हे पाहणे नक्कीच मनोरंजक असेल.

- Advertisement -

अशातच, या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न असून, यांची उत्तरे दर्शकांना लवकरच स्टार प्लसवरील आगामी शो ‘तेरी मेरी डोरियां’मधून मिळतील.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘धारावी बँक’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -