Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'आदिपुरुष'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

‘आदिपुरुष’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री कृती सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून निर्माते चित्रपटाशी संबंधित नवनवीन अपडेट शेअर करत आहेत. दरम्यान, अशातच आता ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

‘आदिपुरुष’चा ट्रेलर होणार रिलीज

‘आदिपुरुष’ दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती शेअर केली आहे. ट्विटरवर ‘आदिपुरुष’ची पोस्ट शेअर करत ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ओम राऊत यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘ट्रेलर 9 मे 2023 रोजी रिलीज होत आहे.’ यासोबत यात प्रभासचा धनुष्यासोबतचा नवा फोटो देखील शेअर केला आहे.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

- Advertisement -

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीता नवमीच्या मुहूर्तावर ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘राम सिया राम’चा ऑडिओ टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. सोशल मीडियावर प्रेक्षकांसमोर ठेवलेल्या या ऑडिओ टीझरच्या रिलीजसोबतच त्याच्या कॅप्शनमध्ये देवी सीतेचे वर्णन देखील करण्यात आले होते. ‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -