बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींनी घेतलंय मुलींना दत्तक

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मुलींना दत्तक घेतले आहे. काहींनी लग्नानंतर मुलींना दत्तक घेतले तर काहींनी लग्नाच्या पूर्वीच मुलींना दत्तक घेतलेले आहे. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा काही अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अनाथ मुलींचे आयुष्य खूप सुंदर बनवले आहे.

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींनी घेतलं मुलींना दत्तक

सुष्मिता सेन

From mother to daughter: Sushmita Sen writes life lessons for  born-from-heart Renee | Bollywood News – India TV

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने लग्न केलं नाही. मात्र, तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. या दोन्ही मुलींचा सांभाळ सुष्मिता खूप मनापासून करते. सोशल मीडियावर सुष्मिता त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. सुष्मिता सेनच्या मुलींचे नाव रिनी सेन आणि अलीशा सेन आहे.

सनी लियोन

READ! Why This Certain Bollywood Actress, Daughter Nisha Was Rejected 11  Times Before Adoption | IWMBuzz

अभिनेत्री सनी लियोनला स्वतःची दोन जुळी मुलं देखील आहेत. पण तिने देखील एका मुलीला दत्तक घेतले आहे. या मुलीचं नाव निशा आहे. या मुलीचा ती खूप छान सांभाळ करते.

रविनी टंडन

Raveena Tandon's Inspiring Story Of Adopting 2 Daughters At Age Of 21

अभिनेत्री रविना टंडनने तिच्या लग्नाच्या आधीच पूजा आणि छाया नावाच्या दोन मुलींना दत्तक घेतले होते. रवीनाच्या एका मुलीचे आता लग्न देखील झाले आहे. शिवाय रवीनाला तिच्या लग्नानंतर रणवीर आणि निशा ही स्वतःची दोन मुलं आहेत.

  • मंदिरा बेदी

Mandira Bedi slams troll who calls her adopted daughter street kid from  slumdog centre - India Today

मंदिरा बेदीला स्वतःचा एक मुलगा आहे. शिवाय तिने एका मुलीला दत्तक घेतले आहे. ज्या मुलीचे नाव तिने तारा बेदी ठेवले आहे.

  • प्रीती झिंटा

Preity Zinta adopts 34 orphans on her b'day, she deserves a lot of respect!  | The Youth

लग्न होण्यापूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटाने एक नाही तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतले होते. या सर्वांचा खर्च आजही प्रीती झिंटा करते त्याचबरोबर लग्नानंतर सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना प्रीतीने जन्म दिला त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.


हेही वाचा :

माझ्या घरचे म्हणाले मुलगा शोध… परिणीतीचा साखरपुड्यातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल