Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'मीमी' सिनेमात महिला प्रधान भूमिकेत दिसणार कृति सेनन

‘मीमी’ सिनेमात महिला प्रधान भूमिकेत दिसणार कृति सेनन

चित्रपटात एका सेरोगेट मदरची कथा दाखवण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन (Kriti sanon) आणि पंकज त्रिपाठी यांचा बहुप्रतिक्षीत ‘मीमी’ (Mimi)सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात फॅमिली ड्रामा दाखवण्यात येणार आहे. तसेच चित्रपटात एका सरोगेट मदरची कथा दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अगदी सोप्या शब्दात कृति स‌ेननला सरोगेटचा अर्थ सांगत आहे. सरोगेट महिलेच्या आयुष्यावर आधारीत या सिनेमात कृति पहिल्यांदाच महिला प्रधान भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘मीमी’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला असून प्रेक्षकांनी काही वेळातच या ट्रेलरला प्रंचड प्रतिसाद दिला आहे. सिनेमाच ट्रेलर फारच उत्कंठावर्धक असून कृतिने सिनेमात सरोगेट मदरची भूमिका साकारली आहे. तसेच ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे कृतिला एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी २० लाख रुपये दिले जातात. मात्र, काही महिन्यांनंतर विदेशी जोडप्यांनी बाळाला स्विकारण्यास नकार देतात यानंतर कृति गर्भपात करण्यास तयार होत नाही. तसेच कृति पंकज त्रिपाठी त्या बाळाचे वडील आहेत, असं खोटं  तिच्या आई-वडिलांना सांगते. तर सई ताम्हणकर कृतिच्या मैत्रिणीची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला तसेच हा सिनेमा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित करणार आहे.(Trailer release of ‘Mimi’ movie, Kriti Sanon to play female lead role for the first time)

ट्रेलर पाहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

चित्रपटात कृति आणि पंकज त्रिपाठीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार आहे. तसेच मनोज पाहवा यांची मुख्य भूमिका सिनेमात आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.हे हि वाचा – मी तर विसरेन, पण सायराजी कसं सहन करतील ? नाना पाटेकर दिलीप कुमार यांच्या आठवणीने भावूक- Advertisement -

 

- Advertisement -