‘KBC 13’ च्या सिझनसाठी नितेश तिवारींनी तयार केली ‘सम्मान’ शॉर्ट फिल्म

‘कौन बनेगा करोडपती’चा १३ वा सिझन लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येतोयं. या १३ व्या सिझनसाठी दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी अगळीवेगळी एक शॉर्टफिल्म तयार केली आहे. सन्मान असे या शॉर्टफिल्मचे नाव असून ती तीन वेगवेगळ्या भागांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. कौन बनेगा करोडपतीच्या प्रोमोशनदरम्यान ही शॉर्टफिल्मचा प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केली जाणार आहेत.

या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण मध्यप्रदेशातील बेरचा या गावांत झाले आहे, यात अभिनेता ओमकार दास माणिपुरी यांनी मुख्य भूमिका निभावली आहे. ओमकार बेरचा गावातील स्थानिक कलाकार आहे. केबीसी हा शो देशातील अगदी अतिदुर्गम भागातील लोकांनाही कसा आपलासा वाटतो या उद्देशाने सन्मान शॉर्टफिल्मचे चित्रण अतिदुर्गम बेरचा गावात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मानवी भावना आणि महत्त्वाकांक्षा यांना पुन: जिवंत केले जाणार आहे. या फिल्ममधील प्रासंगिक पात्र आणि कथा, विनोदी छटांद्वारे प्रेक्षकांना अनपेक्षित रितीने गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कौन बनेगा करोडपती या शोचे होस्टिंग बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या हेस्टिंगमुळे सध्या टीआरपी रेटिंगमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो टॉपवर आहे. कौन बनेगा करोडपतीशी निगडीत अनेक लोकांच्या इच्छा, आकांक्षा जोडलेल्या आहेत. शोमध्ये भाग घेणाऱ्या लोकांचे नशीब रातोरात बदले जे कधी त्यांनी स्वप्नातही पाहिले नसेल. अशाच मानवी भावभावनांना एकत्रितरित्या सन्मान या वेबसीरिजमधून दाखवले जाणार आहे. लवकरचं या शोचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


‘चुकांची पुनरावृत्ती नको,’ केंद्रीय आरोग्य पथकाच्या ठाणे पालिकेला सुचना