घरमनोरंजनदोन लग्नं, तीन अफेअर होऊनही कमल हसनचे एकाकी आयुष्य, काय आहे नेमकं कारण?

दोन लग्नं, तीन अफेअर होऊनही कमल हसनचे एकाकी आयुष्य, काय आहे नेमकं कारण?

Subscribe

दिग्गज अभिनेता कमल हसन यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. 7 नोव्हेंबर 1954 साली त्यांचा जन्म झाला होता. कमल हसन यांनी आत्तापर्यंत टॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा छाप उमटवला आहे. फक्त अभिनयचं नाही तर एक उत्तम दिग्दर्शक, स्क्रीनराइटर, निर्माते देखील आहेत. कमल हासन यांनी आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती.

कमल हसन यांनी 1975 मध्ये ‘अपूर्वा रागांगल’मधून त्यांनी पदार्पण केले होते. कमल हसन आपले चित्रपट आणि अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आले. तसेच त्यांनी दोन लग्न केली होती. मात्र, तरीही ते आता एकटे आहेत. त्यांची दोन्ही लग्न अपयशी ठरली.

- Advertisement -

वाणीसोबत झालं पहिलं लग्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हसन यांचे आत्तापर्यंत पाच महिलांसोबत नाव जोडण्यात आले आहे. 1970 मध्ये अभिनेत्री श्रीविद्यासोबक कमल हसन यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यावेळी त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र, दोघांचं नात फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर 1978 मध्ये कमल हसन यांचं वाणी गणपतिसोबत लग्न झालं. 10 वर्षानंतर हे दोघे वेगळे झाले.

वाणीसोबत घटस्फोट झाल्यानंतर कमल हसनचं नाव अभिनेत्री सारिका सोबत जोडलं गेलं. रिपोर्ट्सनुसार, लग्नाआधीच हे दोघे श्रुती हसनचे आई-बाबा झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना अक्षरा नावाची मुलगी झाली. 2004 मध्ये सारिका आणि कमल हसन वेगळे झाले.

- Advertisement -

22 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत जोडलं नाव
लग्नाव्यतिरिक्त कमल हसन आपल्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले. स्वतःपेक्षा लहान अभिनेत्री सिमरन बग्गासोबतही त्यांचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. याव्यतिरिक्त कलम हसन 13 वर्ष लहान गौतमीसोबत देखील लिव्ह एनमध्ये राहिले. मात्र, 2016 साली हे दोघेही वेगळे झाले.

 


हेही वाचा :

नीतू कपूरने दिली आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दल माहिती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -