घरमनोरंजनशुभमंगल सावधान! प्रियकरासोबत वनिता खरात अडकली लग्नबंधनात

शुभमंगल सावधान! प्रियकरासोबत वनिता खरात अडकली लग्नबंधनात

Subscribe

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात लग्नबंधनात अडकली आहे. वनिताने तिचा प्रियकर सुमित याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिचा विवाहसोहळा पार पडला आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वनिताने तिचा प्रियकर सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली आहे. यावेळी हास्यजत्रेमधील अनेक कलाकार उपस्थित राहिले. गेल्या महिन्याभरापासून वनिता आणि सुमित यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. तर या दोघांचे प्री-वेडिंगचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

वनिता लग्नामध्ये पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या पेहरावात दिसून आली. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली होती. पारंपरिक दागिने घातल्याने वनिताचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते. तर वनिताच्या नवऱ्याने म्हणजेच सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला होता. तर त्याने लग्नांच्या विधीच्या वेळेस डोक्याला फेटा देखील बांधला होता. हे दोघेही त्यांच्या या पेहरावात खूप छान दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

- Advertisement -

वनिताच्या मेहेंदीच्या आणि हळदीच्या कार्यक्रमाला हास्यजत्रेमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. तिच्या हळदीचे फोटो हास्यजत्रेमधील तिची सहकलाकार नम्रता संभेराव हिने शेअर केले आहेत. हास्यजत्रेमध्ये काम करणाऱ्या तिच्या अनेक सहकलाकारांनी हळदीमध्ये धम्माल मस्ती केल्याचे फोटो देखील नम्रताने शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना तिच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – अनन्या पांडे वांद्रे येथील योगा क्लासमध्ये स्पॉट

- Advertisement -

वनिताचा नवरा सुमित लोंढे एक व्हिडीओ क्रिएटर आहे. त्याला फिरण्याचीही आणि नवीन ठिकाणांना भेट देण्याची हौस आहे. एका पिकनिकमध्ये वनिता आणि सुमित एकमेकांना भेटले होते. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची त्या पिकनिकनंतर मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

वनिता खरात ही तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे याआधी चर्चेत आली होती. तिने शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका देखील केली आहे. थोड्यावेळासाठी तिने या चित्रपटात भूमिका साकारली असली तरी या भूमिकेच्या माध्यमातून देखील ती लोकांच्या घराघरात पोहोचली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -