घरमनोरंजनबॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन

Subscribe

त्यांच्या निधनाची बातमी देत त्यांच्या जावयाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय की, आप "दुनिया के सबसे अच्छे पिता थे,आपने मुझे दामाद नही बल्कि, एक बेटे के तरह अपना प्रेम दिया,भगवान आपकी आत्मा को शांति प्रदान करे"

बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजनमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चर्तुवेदी यांचं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, मिथिलेश चतुर्वेदी यांना गेल्या अनेक दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची काळजी घेण्यासाठी लखनऊ येथील ठेऊन घेतलं होतं. दरम्यान, मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्ट रोजी मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला.

- Advertisement -

त्यांच्या निधनाची बातमी देत त्यांच्या जावयाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय की, आप “दुनिया के सबसे अच्छे पिता थे,आपने मुझे दामाद नही बल्कि, एक बेटे के तरह अपना प्रेम दिया,भगवान आपकी आत्मा को शांति प्रदान करे”

मिथिलेश चतुर्वेदी गेल्या अनेक वर्षांपासून टेलिव्हिजन आणि बॉलिवूडशी जोडले आहेत. त्यांनी कोई मिल गया, सनी देओलसोबत ‘गदर एक प्रेम कथा’, ‘सत्या’, ‘बंटी और बबली’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सोबतच सलमानच्या रेडी चित्रपटात देखील त्यांनी सलमानच्या काकांची भूमिका साकारली होती.

- Advertisement -

मिथिलेश चतुर्वेदी यांनी १९९७ मध्ये भाई-भाईमधूल बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. वेगवेगळ्या लहान-मोठ्या भूमिका साकरत त्यांनी आपली ओळख निर्माण केली. सध्या ते Banchhada या चित्रपटांमध्ये काम करत आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -