Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कॅटरीना-विक्कीच्या 'एंगेजमेंट' च्या बातमीवर सनी कौशलने सोडले मौन म्हणाला...

कॅटरीना-विक्कीच्या ‘एंगेजमेंट’ च्या बातमीवर सनी कौशलने सोडले मौन म्हणाला…

साखरपुड्याच्या बातम्या व्हायरल झाल्या नंतर कॅटरीना प्रचंड नाराज झाली होती.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (bollywood)अभिनेता विक्की कौशल (vicky kausha)आणि अभिनेत्री कॅटरीना कॅफ(katrina kaif) हे सर्वाधीक चर्चीत कपल्सपैकी एक आहे. या लवबर्डची (vicky-katrina)जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडिया तसेच बी-टाऊनमध्ये रंगत आहे.दरम्यान दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती(vicky katrina engagement rumours brother sunny kaushal gives reaction) आणि यानंतर चाहत्यांमध्ये तर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बातमी इतकी पसरली की दोघांनाही अधीकृतपणे एक स्टेटमेंट प्रसारीत करावं लागल की आम्ही शूटींगमध्ये व्यस्त आहो या निव्वळ अफवा आहेत. यानंतर चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला होता. मात्र आता विक्कीचा भाऊ सनी कौशल(sunny kausha) याने पुन्हा एकदा हा मुद्द बाहेर काढला असून घरच्यांना विक्कीचा साखरपुडा झाला आहे हे कळल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती याचा खुलासा केला आहे.

सनी कौशल म्हणाला , विक्की आणि कॅटरीनाचा साखरपुडा झाला हे हि बातमी खोटी आहे. मात्र जेव्हा ही बातमी आली, तेव्हा संपूर्ण कुटुंब खळखळून हसले. विक्की त्या दिवशी जिमला गेला होता, त्यानंतर बातम्या येऊ लागल्या. काही वेळाने तो घरी आला. आई आणि वडीलांनी त्याला विनोदाने विचारले, अरे यार, तूझा साखरपूडा झाला आहे, आम्हाला मिठाई तर दे .यावर विक्की म्हणाला, जेवढा खरोखर साखरपुडा झाला आहे तेवढी खरी मिठाई खा. त्यानंतर आम्ही सगळे हसायला लागलो.

- Advertisement -

साखरपुड्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर कॅटरीना प्रचंड नाराज झाली होती. अभनेत्री सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूरने याबाबत माहिती दिली होती. तसेच विक्की आणि कॅटरीना एकमेकांना डेट करत आहेत की नाही याबाबत काहीच स्पष्टता नसली तरीही दोन्ही कपल्सनां अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अनेक प्रमोशन इव्हेंट दरम्यान ,व्हॅकेशन ट्रीप इतकंच नाही तर अनेकदा पॅपराझीने विक्कीला कॅटरीनाच्या घराबाहेर पडताना कॅमेरात कैद केलं होत.


हे हि वाचा – रणवीरची हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांना आले हसू, रणवीरचा एअरपोर्ट लूक व्हायरल !

- Advertisement -