Video: सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत जामवाल Live सेशन दरम्यान रडला ढसाढसा

Vidyut Jamwal got emotional during live session after remembering Sidharth Shukla
Video: सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत जामवाल Live सेशन दरम्यान रडला ढसाढसा

हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर संपूर्ण हिंदी बॉलिवूड इंडस्ट्रीसह टेलिव्हिजनमध्ये शोककाळ पसरली. तसेच सिद्धार्थच्या अचानक एक्झिटमुळे चाहत्यांसह कलाकारांचा धक्का बसला. बॉलिवूडचा अभिनेता विद्युत जामवाल सिद्धार्थच्या जाण्यामुळे खूप डिस्टर्ब झाला आहे. अशा परिस्थितीत विद्युत सिद्धार्थला श्रद्धांजली देण्यासाठी सोशल मीडियावर लाईव्ह आला होता. यादरम्यान विद्युत सिद्धार्थच्या आठवणीत रडताना दिसला.

लाईव्ह सेशनमध्ये विद्युत म्हणाला की, ‘तो जो विचार करायचा, तेच तोच बोलायचा. मी खूप नशीबवान आहे, तो माझा मित्र होता. मी शुक्लाचा खूप वापर केला. मी भारतात कुठल्याही शहरात जायचो आणि कोणालाही भेटायचो जसे की रमेश शुक्ला किंवा क्रिती शुक्लासारख्या व्यक्तींना भेटायचो. तेव्हा लगेच त्यांना म्हणायचो, अरे सिद्धार्थ शुक्ला माझा मित्र आहे. मी गर्वाने सगळ्यांना सांगायचो.’

पुढे विद्युत म्हणाला की, ‘मी सिद्धार्थच्या आईला सांगू इच्छितो की, जेव्हा मी त्याच्यासोबत असायचो तेव्हा मला वाटले की, मी जितका आईवर प्रेम करतो, त्याहून जास्त सिद्धार्थ आपल्या आईवर प्रेम करायचा. मी हे पाहून त्यांच्यावर खूप जळायचो. जेव्हा कोणी मोठा स्टार होतो तेव्हा प्रत्येकजण बोलायला येतो, आय लव्ह यू. सिद्धार्थ शुक्लाचा चाहत्यांना मी सलाम करतो. कारण तुम्हाला माहित होत तो कोण आहे.’

या लाईव्ह सेशन दरम्यान विद्युतने फास्ट अँड फ्युरियसचे गाणे शुक्लाला डेडिकेट केले. ‘तो खूप अमेजिंग माणूस होता. त्याच्यामध्ये काहीच निगेटिव्ह नव्हते,’ असा विद्युत म्हणाला.

पाहा विद्युतचे लाईव्ह सेशन 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)


हेही वाचा – Video: जबरा फॅनने टॅटू काढताच भडकली मिया खलिफा