घरमनोरंजन'पुष्पा'ची श्रीवल्ली विजय देवरकोंडाशी बांधणार लग्नगाठ?

‘पुष्पा’ची श्रीवल्ली विजय देवरकोंडाशी बांधणार लग्नगाठ?

Subscribe

मात्र या लग्नांच्या चर्चांवर विजयने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

साऊथ सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. अशातच या दोघे यावर्षीच लग्नगाठ बांधू शकतात अशाही बातमी समोर येत आहेत. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मात्र या लग्नांच्या चर्चांवर विजयने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले की, नेहमीप्रमाणे बकवास बातम्या, अशा बातम्यांवर आपल्याला प्रेम तर झाले नाही ना?. त्यामुळे रश्मिका आणि विजय खरचं रिलेशनशीपमध्ये आहेत की नाही हे चाहत्यांना समजणे देखील अवघड झालेय.

- Advertisement -

मात्र एका मुलाखतीमध्ये रश्मिकाने तिच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. यावर रश्मिका म्हणाली होती की, अद्याप तरी लग्नबाबत काही विचार केला नाही. परंतु मला वाटते माझा पार्टनर असा पाहिजे ज्याच्यासोबत मी अगदी कंफर्टेबल फील करु शकेन.

- Advertisement -

रश्मिका आणि विजयने ‘गीत गोविंदम’ आणि ‘डियर कॉमरेड’ या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यातील दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

विजय देवरकोंडा सध्या मुंबईत त्याच्या हिंदी डेब्यू चित्रपट लिगरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर रश्मिका गुड बॉय सिनेमासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात रश्मिकाशिवाय अमिताभ बच्चन आणि नीता गुप्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर बॉलिवूड डेब्यू फिल्म मिशन मजनूवर देखील रश्मिका काम करत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा तिचा अपोजिट पार्टनर म्हणून झळकणार आहे.

एका रिपोर्टनुसार, रश्मिकाने नुकतेच मुंबईत एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. दरम्यान विजय आणि रश्मिका दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात गेले होते. दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -