Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'ये जवानी है दिवानी'फेम अभिनेत्री एवलिन शर्मा अडकली विवाहबंधनात

‘ये जवानी है दिवानी’फेम अभिनेत्री एवलिन शर्मा अडकली विवाहबंधनात

एवलिननं बॉलिवूडमध्ये 'फ्रॉम सिडनी विथ लव्ह' या चित्रपटातून 2012 मध्ये पदार्पण केलं होतं.

Related Story

- Advertisement -

‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा विवाह बंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर करत एवलिनने तिच्या लग्नातील काही फोटो पोस्ट केले आहेत. एवलिन शर्माने ऑस्‍ट्रेलियामधील मूळचा भारतीय वंशाचा असणार्‍या डेंटल सर्जन डॉ. तुषान भ‍िंडी सोबत विवाह केला आहे. दोघांनी ब्रिस्‍बेन मध्ये 15 मे 2021 रोजी खाजगीरित्या लग्न उरकले होते. एलविनने लग्नातीत काही खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहले आहे की,”मिस्टर आणि मिसेस भिंडी. या लहानश्या लग्नसमारंभाला आमच्या जीवनातील सर्वात सुंदर दिवस बनवणार्‍या सर्व लोकांचे मी खूप आभार मानते.” फोटो मध्ये एलविन व्हाईट वेडिंग गाऊन मध्ये दिसत आहे तर तुषानने निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

- Advertisement -

एका मुलाखती दरम्यान एलविनने तिच्या लग्नाबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. “आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न करणे यापेक्षा उत्तम अनुभव जीवनात काही असूच  शकत नाही. आम्ही एकत्र आयुष्यजगण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आम्हाला वाटत होते की आमच्या लग्नाला सर्व मित्रपरिवार आणि कुटुंबातील सर्व माणसे उपस्थित असावीत. त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्या सोबत आहे हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही साध्य पद्धतीने विवाह समारंभ उरकला आहे. पण पुढील काही दिवसातच आम्ही एक मोठं सेलिब्रेशनचा प्लॅन करणार आहोत .

एवलिननं बॉलिवूडमध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून 2012 मध्ये पदार्पण केलं होतं. पण, ‘ये जवानी है दिवानी’ मधून तिला लोकांची विशेष लोकप्रियता मिळाली होती. तसेच एवलिनने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकांमध्ये दिसली आहे. चाहत्यांनी  तसेच अनेक बॉलिवूड कलाकरांनी एलविनला तिच्या लग्नाच्या  खूपसार्‍या शुभेच्छा दिल्या आहे


- Advertisement -

हे हि वाचा – HBD:डिंपल कपाडिया यांनी लग्नानंतर घेतला होता10 वर्षाचा ब्रेक

- Advertisement -