घरमनोरंजनYo Yo Honey singh चे जबरदस्त 'बॉडी ट्रान्सफॉर्मेशन'; चाहते म्हणाले, 'किंग इज...

Yo Yo Honey singh चे जबरदस्त ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’; चाहते म्हणाले, ‘किंग इज बॅक’

Subscribe

यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh)  बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध सिंगर आहे. बॉलिवूडमध्ये त्याला जबरदस्त आणि हटके रॅपिंग स्टाईलसाठी ओळखले जाते. मागील काही दिवसांपूर्वी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. त्याची पत्नी शालिनी सिंहने त्याच्यावर घरगुती हिंसाचारचे आरोप केले होते. ज्यामुळे यो यो हनीसिंह चांगलाच अडचणीत सापडला होता. यानंतर यो यो पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आला आहे. पण आता कोणत्या लफडेबाजीमुळे नाही तर आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे यो यो चर्चेचा विषय ठरला आहे. हनी सिंहचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जे पाहून चाहते देखील आश्चर्य चकित झाले आहेत.

हनी सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बॉडी ट्रान्सफॉर्मेशने जबरदस्त फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एकदम स्लिम स्ट्रिम आणि फिट दिसतोय. या फोटोत त्याचे बायसेप्स देखील स्पष्ट दिसून येत आहेत. डोळ्यांवर गॉगल आणि ग्रीन सूज असा हनी सिंगचा ओव्हरलूक चाहत्यांनाही पसंतीस पडला आहे. हनी सिंहने बॉडी ट्रान्सफॉर्मेशचा हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, Lets Roll Hyderabad tonight!! Club Prism. या कॅप्शनवरून तरी समजतेय की, तो सध्या एका इव्हेंटसाठी हैदराबादमध्ये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

- Advertisement -

हनी सिंहच्या या लेटेस्ट फोटोवर आता चाहत्यांकडूनही कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. इतकेच नाही तर जॅजी बी, सारा गुरपाल, जस्सी सिद्धूसारख्या स्टार्ससनी देखील त्याचा फोटोवर कमेंट केली आहे. सोशल मीडियावर एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, किंग इज बॅक. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, पाजी तुस्सी कमाल दिख रहे हो. त्यामुळे चाहत्यांकडून आता हनी सिंहच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव सुरु आहे.


राकेश बापटने रिलेशनशिपवर केलं वक्तव्य, ‘शमिता माझी चांगली मैत्रीण’


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -