आलिया – नवाजुद्दीनचे भांडण टोकाला; पत्नीचा आरोप, तुझ्या मॅनेजरनं माझ्या मुलीला वाईट पद्धतीनं…

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीचे खासगी जीवन कठीण टप्प्यातून जात आहे. नवाजुद्दीन आणि त्याची घटस्फोटीत पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात सतत अनेक वादविवाद सुरु आहेत. सुरुवातीला आलियाने नवाजुद्दीनवर बलात्कार केल्याचा आरोप केला त्यानंतर तिने एक व्हिडीओ शेअर करत मुलांसह आपल्याला नवाजुद्दीने घराबाहेर काढलं असल्याचा आरोप केला. नवाजने देखील तिचे सर्व आरोप फेटाळत एक मोठी पोस्ट इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. दरम्यान, अशातच पुन्हा एकदा आलियाने नवाजुद्दीनसोबत झालेल्या भांडणाचा एक ऑडिओ शेअर केला आहे.

आलियाने शेअर केला नवाजुद्दीनसोबत झालेल्या भांडणाचा ऑडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

आलिया सातत्याने नवाजुद्दीनवर अनेक आरोप करत आहे. नवाजुद्दीनबाबत अनेक पुरावे सोशल मीडियावरुन शेअर करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आलियाने वाजुद्दीनसोबत झालेल्या भांडणाचा एक ऑडिओ शेअर केला आहे. ज्यात आलियाने नवाजुद्दीनच्या मॅनेजरने त्यांच्या मुलीला वाईट पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

तसेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या लेटरमध्ये तिने लिहिलंय की, “तू अत्यंत बेजबाबदार पिता आहेस. कारण स्वतःच्या लहान मुलीला तू तुझ्या पुरुष मॅनेजरसोबत एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं.  मॅनेजरबरोबर मुलीला दुबईला पाठवलं, मला  गोष्टीची माहिती नव्हती.  त्या मॅनेजरनं माझ्या मुलीला वाईट पद्धतीनं स्पर्श केला इतकंच नाही तर, अनेकदा तिला मिठी मारण्याचाही प्रयत्न केला. हे तो सतत करत होता. त्यावेळी माझी मुलगी अस्वस्थ झाली होती. तू त्यावेळी तुझ्या मुलीबरोबर नव्हतास. तू बेजबाबदार वडील आहेस.” असं आलियाने लिहिलंय आहे.

 


हेही वाचा :

मल्टिस्टारर “उर्मी” या चित्रपटाचा टीजर लाँच