घरफिचर्ससात-आठ तंबू ठोकून राहणारे इराणी शंभर घरांचे मालक

सात-आठ तंबू ठोकून राहणारे इराणी शंभर घरांचे मालक

Subscribe

आंबिवली स्टेशन जवळ असणार्‍या मोकळ्या जागेवर १९७० ते ८० दरम्यान इराणी लोक आपल्या परिवारासह येथे वास्तव्यास येऊ लागले.

आंबिवली स्टेशन जवळ असणार्‍या मोकळ्या जागेवर १९७० ते ८० दरम्यान इराणी लोक आपल्या परिवारासह येथे वास्तव्यास येऊ लागले. त्या काळात खुल्या दिसणारे जागेवर अतिक्रमण करून तंबू ठोकून राहत होते. मात्र याठिकाणी त्यांना त्या काळात स्थानिकांनी राहण्यास विरोध न केल्याने आज निमित्त त्यांची लोकसंख्या किमान २४० आसपास झाली आहे. स्थानिकांनी त्यांना जागा विकली तर काहींनी घरी विकली. विकत घेतलेल्या जागेवर आरसीसी बांधकाम तर काहींनी लोड बेरिंग इमारत उभी करून स्वतंत्र अशा इराणी नगर वसाहतीची निर्मिती केली. तर काहींनी शासकीय भूखंड गिळंकृत केले आंबिवली स्टेशननजीक असणार्‍या या वसाहतीमध्ये राहत असणार्‍या पुरुष व महिला कुठल्याच उद्योगात दिसत नाही. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी ते गुन्हा करत नाही किंबहुना चोर्‍या, साखळी खेचणे, बँकेबाहेर नागरिकांना दिशाभूल करण्यासाठी पैसे टाकणे, शर्टावर घाण पाण्याचे शिंतोडे उडवणे असे प्रकार ते सर्रासपणे करत असल्याने सहज आणि सुलभरीत्या येणार्‍या पैशावर मौजमजा करणे, चोरून आणलेल्या व पासिंग न झालेल्या दुचाकी गाड्या गायब करून त्याची विक्री करणे हा त्यांचा पैसा कमविण्याचा मोठा मार्ग आहे.

दहा ते बारा वर्षांपूर्वी पोलिसांनी ’कोबींग ऑपरेशन’करून दोन सराईत गुन्हेगारांना गाडीत टाकून घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त इराणी जमावाने पोलीस गाडीवर तुफान दगडफेक सुरू केली. याच दरम्यान पोलिसांनी आरोपी पळत असल्याचे पाहून त्यांच्यावर फायर केले असता हे दोन्ही आरोपी या गोळीबारात मृत्युमुखी पडले. पोलिसांनी गोळीबार केला नसता तर किमान चार ते पाच पोलिस मृत्युमुखी पडले असते, असे जाणकार सांगत आहे.

- Advertisement -

इराणी नगर या वसाहती बरोबरच पाटील नगर, मंगल नगर व अन्य वसाहतीत इराणी परिवार राहत असून त्यांच्याकडे टॅक्स पावती, पाणीपट्टी, मतदार यादीत नाव, रेशन कार्ड आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड आदी शासकीय सुविधांचे कार्ड आहे. उपजीविकेसाठी चोर्‍या करणे हे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत्र आहे. यामुळे बहुतेक वेळा बाजार पेठेतील हॉटेलमध्ये सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीचे जेवण हॉटेलमध्येच करतात. पोलिसांनी दहा वर्षांपूर्वी त्यांच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करून बँकेत स्वतःच्या नावावर असणारे बँक लॉकर, दैनंदिन बँक खाते, पतपेढी आणि चोरीचे सोने विकत घेणारे सोनार यांच्यावर वक्रदृष्टी ठेवून बँक खात्यांना सील ठोकले. त्यात लॉकरमध्ये लाखोंचे सोने आढळून आले. त्यावेळी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी इरानी पुरुष व महिला यांना टाडा लावला. यामध्ये किमान पंचवीसपेक्षा अधिक अजूनही तुरुंगवास भोगत आहे.

ठाणे जिल्हा व इतर पोलीस ठाण्यात या वस्तीचा चोरीमध्ये अव्वल नंबर असून प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यांच्या नावाचा फोटो दिसून येतो. ७० ते ८० च्या दरम्यान तंबूत राहत असणारे इराणी त्याकाळी उपजीविकेसाठी चष्मा, गॉगल आणि सुगंधी अत्तर असे विकून गुजरा करत होते. मात्र इराणी वस्ती जसजशी वाढू लागली, तसतसे मालकी हक्काच्या जागा ग्रामस्थांकडून विकत घेऊन बांधकामे करू लागली. अंबिवली स्टेशन जवळच या वसाहतीचा मोठा पसारा २५-३० वर्षाच्या काळात वाढू लागला. या वसाहतीत त्यांनी मोठी मस्जिद बांधली असून दिवंगत शिवसेना नेते माजी मंत्री साबीर भाई शेख यांनी या वसाहतीकरता स्वतंत्र कब्रस्तान दिले आहे.

- Advertisement -

या वसाहतीत राहणारे इराणी सगळ्या राजकीय पक्षात पदाधिकारी असून काही जण विशेष कार्यकारी अधिकारीदेखील आहेत. या ठिकाणी पोलीस गुन्ह्यात असणार्‍या आरोपीला पकडण्यात आले असता सर्वात अगोदर महिला पोलिसांसमोर येऊन डिंगडाँग करतात आणि मग पुरुष मुले दगडफेक व लाठीकाठी करून आरोपींना पळवून लावण्यास मदत करतात. आजचा पोलिसांवर अशाच स्वरूपाचा हल्ला करून आरोपीला पोलिसांच्या गाडीमधून पळवून लावले आहे.

(लेखक –  सिद्धार्थ गायकवाड, हे टिटवाळा प्रतिनिधी आहेत)

हेही वाचा –

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतूदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -