घरफिचर्सताई- शिक्षिका आणि आधार

ताई- शिक्षिका आणि आधार

Subscribe

आपल्या आयुष्यात असे बरेच क्षण येत असतात त्यामुळे आपणास काही आठवणी जाग्या होतात व आपण क्षणभर हळवे होऊन त्याच्याशी सामना देण्यास तयार होतो.

आपल्या आयुष्यात असे बरेच क्षण येत असतात त्यामुळे आपणास काही आठवणी जाग्या होतात व आपण क्षणभर हळवे होऊन त्याच्याशी सामना देण्यास तयार होतो. त्या आठवणींपैकी अशीच एक आठवण म्हणजे मी आज साठी ओलांडल्यानंतर लिखाण लिहिण्यास सुरुवात केली त्याला कारण म्हणजे माझी ताई. माझ्या ताईचे लग्ना आधीचे नाव प्रमिला सीताराम कोकाटे व लग्नानंतर सरला सीताराम जठार असे आहे. तिने प्रोत्साहन दिल्यामुळे मी लिखाण करू शकले.

माझी ताई सर्वात मोठी व मी सर्वात लहान. माझ्यात व ताईत १३ वर्षांचे अंतर होते. तिची मी खूप लाडकी होते. पूर्वी मुलीचे लग्न लवकर करीत असे त्यामुळे ताईचे लग्न लवकर झाले होते. ताईच्या लग्नानंतर २-३ वर्षांच्या आत माझ्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. दुःखाचा डोंगर कोसळला. आम्ही भावंडं लहान होतो. अशा प्रसंगी वडिलांच्या मृत्यूनंतर ताईनेच आम्हाला सर्वतोपरी मदत केली होती. तिच्या मार्गदर्शनामुळे आम्ही भावंडं शिक्षण घेऊन आपापल्या पायावर उभे राहिलो. ताईचे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही.माझी ताई शिक्षिका होती. ती कधी रागावली, दम दिला तरी आपल्या भल्यासाठीच आहे हे आम्ही भावंडं जाणून होतो.

- Advertisement -

तिच्यावर न रागावता तिच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आम्ही सर्व भावंडं आपापल्या पायावर उभे राहिलो. अशा माझ्या ताईचे नुकतेच सन २०१८ मध्ये निधन झाले.आता फक्त आठवणीच शिल्लक आहेत. व्यक्ती गेल्यावर तिचे महत्व आपल्याला समजते. अशी ताई मला पुढील जन्मी मिळो व त्यावेळी तिला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे सांगताना सुद्धा डोळ्याच्या पापण्या पाणावतात. ताई तुझी खूप आठवण येते.


-वृंदा हरयाण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -