घरफिचर्सविक्रमवीर सुनील गावस्कर

विक्रमवीर सुनील गावस्कर

Subscribe

क्रिकेटमधील विक्रमवीर सुनील मनोहर गावस्कर यांचा आज जन्मदिन. क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू अशी त्यांची ख्याती आहे. याचा जन्म १० जुलै १९४९ रोजी मुंबईत झाला. सेंट झेवियर्स शाळा व त्याच नावाच्या महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. 1970 मध्ये त्यांनी बी.ए. ची पदवी संपादन केली. 1974 मध्ये त्यांचा विवाह मार्शनील मेहरोत्रा या युवतीशी झाला. त्यांना रोहन हा एक मुलगा आहे. गावस्कर यांचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते. त्याचे एक मामा माधव मंत्री ह्यांनीही भारतातर्फे कसोटी सामन्यांत भाग घेतला होता. शिवाय त्यांचे दोन्ही आजोबा आणि आई ह्यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. ह्या क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे गावस्कर यांना लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली.

शाळेच्या कनिष्ठ संघात असल्यापासूनच त्यांनी फलंदाजीचे तंत्र आत्मसात केले. बॅट सरळ कशी धरायची, बॅटवरची हाताची पकड कशी ठेवायची आणि झेल उडू नये म्हणून कोणता पवित्रा घ्यायचा, या बाबतींत त्यांना प्रसिद्ध प्रशिक्षक कमल भांडारकर यांचे मार्गदर्शन मिळाले. गावस्कर मुंबईच्या आंतरशालेय हॅरिस ढाल स्पर्धेत (1965-66) खेळले. त्याच वर्षीच्या कुचबिहार करंडक सामन्यात पश्चिम विभागाच्या संयुक्त शालेय संघातर्फे खेळताना गावस्कर यांनी एकूण 760 धावा काढल्या होत्या. कसोटीत लंडन शालेय संघाविरुद्ध त्यांनी शतक झळकावले. त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट शालेय खेळाडूसाठी असलेला जे. सी. मुखर्जी करंडक त्यांना मिळाला. यानंतर त्याने आपले क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. महाविद्यालयात गेल्यावर त्याला दर शतकामागे वडिलांकडून दहा रुपये प्रोत्साहन म्हणून मिळत.

- Advertisement -

महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये पदार्पण करताच त्यांनी गुजरात विद्यापीठाविरुद्ध शतक ठोकले. आंतरविद्यापीठ सामन्यांत मुंबई विद्यापीठाकडून खेळताना त्यांचा वेस्ट इंडीजच्या हंट याच्याशी परिचय झाला. फटका मारण्याआधी बॅट उचलून मागे सरण्याचा (बॅक लिफ्ट) पवित्रा, बॅट खूपच सरळ आणि उंच उचलणे व डावा पाय चेंडूच्या टप्प्यापर्यंत पुढे ताणणे, या हंटच्या तंत्रावर त्यांनी स्वत:चे फलंदाजीचे तंत्र बेतले. अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू देणार्‍या दादर युनियन स्पोर्टिंग क्लबचा गावस्कर सभासद झाले (1969). विझी करंडकासाठीच्या आंतरविद्यापीठ विभागीय सामन्यात त्यांच्या नेतृत्वात पश्चिम विभागाने हा करंडक जिंकला. पुढच्या मोसमात त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठ संघाने रोहिंग्टन बारिया करंडक जिंकला. तसेच श्रीलंकेत उपकर्णधार म्हणूनही ते गेले.

तिकडे त्यांनी बलाढ्य अशा तेथील अध्यक्षीय संघाविरुद्ध द्विशतक केले. 1970-71 मध्ये पुण्यात झालेल्या आंतरविद्यापीठ सामन्यात 327 धावा काढून त्यांनी बारा वर्षांपूर्वी अजित वाडेकर यांनी केलेला 324 धावांचा विक्रम मोडला. वेस्ट इंडीजला जाणार्‍या भारतीय संघात त्यांची निवड झाली 1971. ही त्यांची पहिली कसोटी मालिका. सुनील गावस्कर हे खरे अभ्यासू खेळाडू होय. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी इर्षा निर्माण केली. क्रिकेटपटूंचे हितसंबंध सांभाळण्याचे कामही त्यांनी तत्परतेने केले. खेळातून निवृत्त झाल्यावरही त्यांची हीच वृत्ती दिसून येते. त्यांचे अनुकरणीय गुण म्हणजे निर्व्यसनीपणा, मितहार, नियमितपणा आणि मातृपितृभक्ती हे होत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -