घरफिचर्ससारांशएक मसालापट....’घर,बंदूक,बिर्याणी’

एक मसालापट….’घर,बंदूक,बिर्याणी’

Subscribe

पिस्तुल्यापासून नागराज मंजुळे या नावाचे गारुड सुरु झाले. ते फँड्री, सैराट, झुंड या क्रमाने अधिक पकड घेत गेले. नुकताच ’घर,बंदूक,बिर्याणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट पाहताना लक्षात आले कि, नागराज मंजुळे यांना मराठी चित्रपटाचा कॅनव्हास मोठा करायचा आहे. अर्थात यामुळे टिपिकल मराठी चित्रपट थेट झेप घेऊन हॉलिवूडशी शर्यत करणार नाही पण त्याला त्याचा स्वतःचा असा सुगंध असला पाहिजे, त्याची स्वतःची अशी मजा पाहिजे, याबद्दल नागराज आग्रही असल्याचे जाणवते. ’घर बंदूक बिर्याणी’ चित्रपटाचे प्रमोशन छान झाले होते, ट्रेलर बहुचर्चित ठरला होता, गाणी सर्वत्र वाजत होती. या सार्‍या गोष्टींचा चित्रपटाला फायदा झालाच आहे. पब्लिक थिएटरपर्यंत आणलं गेलं आहे. सामान्य तरुण, अस्वस्थ तरुण पोलिस आणि विद्रोही तरुण या तरुणाईला एका सुंदर कथानकात बांधण्यात नागराज टिम यशस्वी झाली आहे.

— आशिष निनगुरकर

आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे हे मुख्य कलाकार आणि अन्य दुय्यम अशी बाब यात जाणवत नाही, कारण या चित्रपटात सातार्‍याची श्वेतांबरी घुडे, बार्शीचा विठ्ठल काळे, नागपूरचा नीरज जमगाडे- मायकल, सोलापूरचा सोमनाथ अवघडे, नांदेडचा संतोष व्हडगीर (नाईक), भंडाराचा ललित मटाले, औरंगाबादचा प्रवीण डाळिंबकर, यवतमाळचा किरण ठोके, सोलापूरचा सुरज पवार यांनी या चित्रपटात चार चाँद लावले आहेत. तर नांदेडचा किशोर निलेवाडी, नागपूरचा प्रियांशू छेत्री- बाबू, पुण्याचा सुभाष कांबळे,आमच्या इचलकरंजीचा गिरीश कोरवी, औरंगाबादचा चरण जाधव, बीडचा अशोक कानगुडे, जळगावचा आशिष खाचणे असे दमदार कलाकार आहेत ज्यांच्यामुळे ही बिर्यानी रुचकर झाली आहे.

- Advertisement -

चित्रपटात पुर्वार्ध डार्क कॉमेडीने खुलला आहे, पण उत्तरार्ध थोडा लांबल्यासारखा वाटतो. पूर्वार्ध सुंदर गाण्यांनी देखणा झाला आहे. सायली पाटील व आकाशची केमिस्ट्री जुळण्याआधीच एक तुटकपणा तयार झाल्याचे जाणवते. पण हा वियोगच कथानकात आकाशच्या वागण्यातील बदलाला पायाभूत ठरतो. यातील नागराजचे पात्र लार्जर दॅन लाईफ, बेदरकार साकारले आहे आणि अण्णा त्यात शोभलाही आहे. अनेक फ्रेम्सवर सिंघमचा प्रभाव जाणवतो पण हा पोलिस फिल्मी न वाटता जमिनीशी अधिक प्रामाणिक जाणवतो. हा चित्रपट परत दुसर्यांदा पहायचा ठरवला तर तो यातील गाणी, नागराजचा रोल आणि छायाचित्रणासाठी पाहणे आवडेल.

’घर बंदुक बिर्याणी’ च्या निमित्ताने असं स्पष्ट दिसतय,परफेक्ट व्यावसायिक यश कसं खेचुन आनायचं याचं तंत्र नागराज मंजुळे कडे आहे, पण आता फक्त त्यांना तेच दाखवायचं आहे जे त्यांना आवडतं आणि ते देखील चोखपणे आणि प्रामाणिकपणे. सिनेमाची कथा सरळ साधी तिन कॅरेक्टर च्या भोवती फिरते, पहीला आहे पप्पन(सयाजी शिंदे)नावचा नक्षलवादी, ज्याचा पोलिसांवर प्रचंड राग आहे, पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला मारून टाकले आहे. पोलिसांचा बदला घ्यायचा हेच आता त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. दुसरा आहे राजु आचारी (आकाश ठोसर) ज्याचं लग्न यासाठी मोडलं आहे की त्याच्याकडे राहायला घर नाही आणि घरासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी आहे.

- Advertisement -

आणि तिसरं कॅरेक्टर आहे इन्स्पेक्टर राया (नागराज मंजुळे) ज्याने आमदारच्या पोरांसोबत पंगा घेतलाय म्हणुन त्याला शिक्षा म्हणुन त्याची पुण्यातून बदली थेट कोलागड च्या जंगल भागात केली आहे. तिन्ही दिशेला जानारी ही तिन कॅरेक्टर कोलागड च्या जंगलात एकत्र कसे येतात आणि त्यांच्या समस्यांचे पुढे काय होतं,हे प्रत्यक्ष थेअटर मध्ये जाऊनच बघण्याची मजा आहे. नागराज मंजुळे ने उभा केलेला इन्स्पेक्टर राया भलतीच छाप पाडुन गेला. एक डॅशिंग मास हिरो पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे नागराज ने सादर केला.सयाजी शिंदे यांचं अख्ख कॅरेक्टर सुरवातीपासून ते शेवटपर्यंत ब्लॅक कॉमेडीतुन साकारलेलं आहे. त्याची प्रत्येक डायलॉग आणि मूव्हमेंट आहे. पण ते सामान्य प्रेक्षकाच्या पचनी पडनारं नाही.

आकाश ठोसर म्हणजेच राजु आचारीने एक लग्नाळु प्रियकर साकारलाय. पण त्याची प्रेयसी सायली पाटील मात्र या सिनेमात फक्त चवी पुरती ठेवलेली आहे. ती नसली तरी सिनेमात काहीच फरक पडला नसता. सिनेमात नायिका असली पाहीजे या अंधश्रद्धेपोटीच तिची या सिनेमात वर्णी लागलेली आहे.कोलागड चा जंगली भाग आणि त्याचे अंतरंग डोळ्यात भरणारं आहे. पोलिस आणि आतंकवादयाची चकमक अत्यंत अचुकपणे टिपलेली आहे. सर्वच गाणी श्रवणीय आहेत.परंतु पहिल्या हाफ मध्ये सिनेमाची गती अतिशय मंद आहे. स्टोरी डेव्हलप करायला खुपच वेळ घेतल्याने कथा बर्‍याच वेळा रेंगाळत राहते आणि कंटाळून प्रेक्षक मध्यंतराची वाट बघत बसतात.

मध्यंतरानंतर सिनेमा वेग घेतो. परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे नागराज मंजुळे च्या सिनेमाला पसंत करणारे प्रेक्षक, काहीतरी धक्कादायक किंवा अचानक थ्रीलींग बघायला भेटेल अशी अपेक्षा करून येतात, ती मात्र इथे पुर्ण होणार नाही. सिनेमाचत पुढे काय घडणार हे कोणताही प्रेक्षक सहज सांगु शकेल. सिनेमाच्या अगदी शेवटच्या टोकाला किशोर कदम यांची एंट्री म्हणजे एकतर सिनेमा चा दुसरा भाग येणार आहे किंवा लवकरच नागराज मंजुळे नविन

’घर बंदूक बिर्याणी’ हा इतर मराठी चित्रपटांच्या सारखाच एक व्यावसायिक, मसाला सिनेमा आहे, साऊथला तोडीस तोड , अस्सल मराठी ऍक्शनपट म्हणजे घर बंदुक बिर्याणी. फाईट सिन जबराट आहेत, बर्‍याच वेळा साऊथ सिनेमा पाहतो असा भास होतो. नागराज अण्णा यांनी बरेच सामाजिक प्रश्न मांडलेत, संगीत प्रभावी आहे,गाणी छान झालीत आशेच्या भांगेची नशा , गुण गुण गुण गुण छान जमलय , महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील घेतलेले कलाकार ,सर्व टिम, मस्त चवदार बिर्याणी बनलीय मला तर सिनेमा भारी आवडला .

‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट मनोरंजन आणि प्रबोधन यांच्या सीमांवर रेंगाळत राहतो. एक घरासाठी झुरणारा, दुसरा बंदुकीत अडकलेला, तर तिसरा बिर्याणीमुळं अडकून बसलेला असे तीन रूढ अर्थानं नायक म्हणता येणार नाहीत, असे नायक कथेत आहेत. त्यांच्या समांतर, तर काही ठिकाणी छेदणार्‍या गोष्टींचा कोलाज दिग्दर्शक उभा करतो. अभिनय, संगीत, छायाचित्रण, ऍक्शन या आघाड्यांवर दमदार कामगिरी करणारा हा चित्रपट कथेतील क्लिष्टता आणि तिची लांबी या आघाड्यांवर कमी पडतो. मात्र, नागराज मंजुळे या एकाच नावासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचंय, त्यासाठी त्यांचा स्वतःशी आणि त्याचबरोबर समाजाशीही संघर्ष सुरू आहे. यात त्यांच्या घरच्यांचा व सहकार्‍यांचा स्वार्थ, त्यांच्या जगण्याची धडपडही समाविष्ट आहे. या सर्वांच्या कथा एकमेकांशी छेदताना जोरदार खडखडाट होतो, खडाजंगी होते. प्रामाणिकांचा विजय होतो, स्वार्थी या लढाईमध्ये हरतात.

पुढच्या भागाची बेगमी करीत ही कथा संपते. चित्रपटाची कथा बर्‍यापैकी क्लिष्ट आहे. तिघांचं आयुष्य, त्यांवर प्रभाव टाकणारे त्यांचे आप्तस्वकीय आणि पुन्हा या तिघांतील संघर्ष असा मोठा पट कथेला आहे. त्यामुळं सुरवातीला तीन समांतर कथा पाहात असल्यासारखं वाटत राहतं. तिघांच्या कथा एकमेकांना भिडल्यानंतर पात्रांची मोठी गर्दी होते. त्यामुळं कथेची लांबीही अनावश्यक वाढत जाते. काही ठिकाणी प्रसंगांची पुनरावृत्ती होती, तर अनेक प्रसंग संपादनात काढले जाणे आवश्यक होते. पल्लमचं पात्र ज्या सहजतेनं माणसांना गोळ्या घालतं, त्याच सहजतेनं विनोदही करतं, तर राजूला नक्की काय साध्य करायचं याबद्दल प्रेक्षकांचा गोंधळ उडतो. रायाचं पात्र तुलनेनं लिखाणात उजवं आहे, मात्र पोलिसांमधीलच संघर्षाची जोडकथा पटतही नाही आणि प्रभावही पाडत नाही. लक्ष्मीच्या पात्राचंही लिखाण पुरेसं ठसत नाही. त्याच्या जोडीला या कोणत्याही पात्राचा पार्श्वभूमी पुरेशी स्पष्ट न केल्यानं त्यांच्या वागण्यामागची मानसिकता पोचत नाही.

तरीही, कथा एक समान वेगानं पुढं सरकते व उत्सुकता कायम ठेवते. चित्रपटाच्या शेवटाचा प्रसंग खूपच लांबला आहे व दुसर्‍या भागाची तयारी केल्यानं तो काहीसा पातळही झाला आहे. कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू. नागराज मंजुळे धडाकेबाज नायकाच्या भूमिकेत सर्वाधिक भाव खातो. क्शन, इमोशन आणि कॉमेडी यांत तो प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतो. सयाजी शिंदे डाकूची भूमिका नेहमीच्या झोकात साकरतात. आकाश ठोसरच्या वाट्याला आलेली भूमिका वेगळी आहे आणि त्याचीही चांगला प्रभाव पडतो. सायली पाटील व दीप्ती देवी यांच्या वाट्याला मोजकेच प्रसंग आले आहेत. तानाजी गालगुंडे, सोमनाथ अवघडेसह अनेक कलाकारांची फौजच चित्रपटात आहे व हे सर्व जण छोट्या भूमिकांत छान कामगिरी करतात.

नागराज अण्णांचा सिनेमा आहे म्हटल्यावर बघणार्‍यांच्या अपेक्षा आधीच खुप वाढलेल्या असतात.म्हणून बघून झाल्यावर वाटलं अजून छान बनवता आला असता आणि काहीतरी मॅसेजही देता आला असता किंवा काही मॅसेज दिलाही असेल पण माझ्या नजरेतून सुटला असेल तर माहित नाही.नागराज अण्णाची ऍक्शन, सयाजींची कॉमेडी,आकाशची लग्नाची धडपड आणि कुठेतरी विदर्भातल्या भाषेचा तडका,तसेच बायकांची बायकोगीरी आणि एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याच वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य कसं असत हे या सिनेमात बघायला मिळणार आहे.

सिनेमाची घोषणा लवकरच करणार.एकंदरीत एकदा सिनेमा बघायला काही हरकत नाही. परंतु फँड्री किंवा सैराट सारखा दीर्घकालीन प्रभाव टाकणारा सिनेमा नक्कीच नाही. आतंकवादयांना पोलिसांचा बदला यासाठी घ्यायचाय की पोलिसांनी मारीया नावाच्या त्यांच्या साथीदाराला मारले. खरंतर इथे अनेक सामाजिक प्रश्न मांडण्याचा खुप मोठा स्कोप होता जो नागराज मंजुळे यांनी मिस केला. चित्रपटाचं चित्रण व संगीत मनमोहक. ‘हाण की बडीव’ हे गाणं, त्याचं संगीत आणि चित्रण वेगळाच अनुभव देऊन जातं. एकंदरीतच, वेगळी कथा असून, नागराज मंजुळे यांच्या करिष्म्यामुळं प्रेक्षणीय ठरलेला हा प्रयोग एकदा अनुभवायला हरकत नाही.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -