घरफिचर्ससारांशशिवाकडून शिवाकडे.....शंकर, शिव एक चिकित्सा

शिवाकडून शिवाकडे…..शंकर, शिव एक चिकित्सा

Subscribe

–प्रशांत कळवणकर

पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणु अशी सुरुवातीला समजूत होती त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या अतिसूक्ष्म कणांचा शोध लागला. नंतरच्या टप्यात सहा क्वार्क्स (अप, डाऊन, लेफ्ट, राईट, चार्म आणि स्ट्रेन्ज) चा शोध लागला जे त्याहूनही सूक्ष्म आहेत, तर मग त्याहूनही सूक्ष्म कणाचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही, असे शास्त्रज्ञांना वाटू लागले, मग सर्वात अंतिम सूक्ष्म कण ज्याला गॉड पार्टीकल असे म्हणतात. अस्तित्वात असावा या धारणेला बळकटी मिळत गेली आणि एक नवीन कल्पनासिद्धांत (hypothesis) जन्माला आला तो म्हणजे स्ट्रिंग थेअरी.

- Advertisement -

या थेअरीनुसार हे विश्व एकाच अति अंतिम सूक्ष्म कणांपासून बनले आहेत. या कणाचं वर्णन गितेत असं करण्यात आलं आहे …..

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः॥’

- Advertisement -

अर्थ : नैनं छिन्दन्ति शस्त्राणि l (ज्याचा कोणतेही शस्त्र भेद करू शकत नाही), नैनं दहति पावकः l (ज्याला अग्नी जाळून नष्ट करू शकत नाही.), न चैनं क्लेदयन्त्यापो l (पाणी ज्याला ओले करू शकत नाही.), न शोषयति मारुतः l (ज्याला वायू सुकवू शकत नाही.)

याच अति अंतिम सूक्ष्म कणाला (smallest particle) आपल्या प्राचीन ग्रंथात ‘शिव’ म्हणून संबोधले गेले आहे. ‘शिव’ हे एक प्रतिकात्मक संबोधन आहे, ज्याचा ईश्वर या अर्थाशी संबंध जोडला जातो. या कणाबद्दल (शिव) गुरू गोरक्षनाथांच्या ‘सिद्ध सिद्धांत पद्धती’ या ग्रंथात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.

शिव म्हणजे मूलकण आणि या मूलकणापासूनच विश्वाची निर्मिती झाली आहे. या मूलकणाला गती देणारी ही शक्ती जी आदी आहे. शिव-शक्ती यांचं मिलन हेच विश्व निर्मितीमागचे तात्विक सत्य आहे, शास्त्र आहे, त्याच मूलकणाचा गॉड पार्टिकल (हिंग्ज बोसॉन ) शोध स्वित्झरलँड येथे (LHD) लार्ज हेड्रोन कोलायडर उभारून घेतला जात आहे. शिव हा मूलकण आहे, तर शक्ती हे चेतन आहे आणि चेतन- अचेतानाच्या संयोगातूनच पिंड-ब्रम्हांडाची निर्मिती झाली आहे.

पिंड हे ब्रम्हांडाचं लघु रूप आहे, तर अणू हे सूक्ष्म रूप आहे, असं मानणाराही एक वर्ग आहे, पण वैज्ञानिक आधार मिळेपर्यंत तो एक कल्पनासिद्धांत (hypothesis) आहे.शिव-शक्ती म्हणजेच शिव पार्वती. या मूलकाणांचं ज्यावेळेस मिलन होते त्यावेळेस स्फंद म्हणजे पापण्यांची उघडझाप होते, अशी गती निर्माण होते, ज्याचा ‘उन्मेख मात्रेन’ असा उल्लेख गुरू गोरक्षनाथांनी केला आहे. स्टीफन हॉकिंग हया प्रख्यात शास्त्रज्ञाने ने केलेलं मूलकणांच्या पहिल्या गतीचे वर्णन आणि गोरक्षनाथांच्या ‘सिद्ध सिद्धांत पद्धती’ ग्रंथातील वर्णन बर्‍यापैकी सारखे आहे.

गोरक्षनाथांनी ‘एकोहं बहूस्यामी’ म्हणजे ज्या एकाचा बहू झाला ही अर्थात ‘बिग बँग थेअरी’ च आहे. शिवापासून सुरू होणारा प्रवास शेवटी शिवाजवळच संपतो म्हणून या मूलकणाला अर्थात शिवाला निर्माता आणि नाश करणाराही म्हटले आहे. गॉड (GOD) म्हणजे तरी काय Generation (निर्मिती), Organisation (संघटन) आणि Destruction (नाश).

गुरू गोरक्षनाथांच्या ‘सिद्ध सिद्धांत पद्धती’ या ग्रंथाचा सार काही ओळीत नमूद करत आहे …..
शिवाकडून शिवाकडे….

अकुल अव्यक्त बिंदुरुपी शिवाचे आदी शक्तीशी मिलन होते,
स्फण्द निर्माण होतात…
निजा …. परा…. अपरा…. सूक्ष्मा…..
अवस्थांतर होते….
व्यक्त-अव्यक्त ‘शेश’ शक्ती जडात प्रकट होते,
माया रूप धारण करते….
अचेतन, चेतनेच्या आधाराने आकार घेते,
अमर्याद विश्वातल्या असंख्य जीवांपैकी….
एक शूद्र जीव… मानव….
नर-मादी, धन-ऋण अशा परस्पर विरोधी शक्तींच्या मंथनातून जड देह स्थिरावतो…
पाप-पुण्याचा हिशेब करत….
भोग भोगत…
शटचक्रांचा गुंता सोडवत….
परत प्रवास सुरू होतो…
त्याच अकुल, अव्यक्त बिंदुरुपी शिवाच्या दिशेने
अव्याहतपणे…..
जे घडते पिंडात तेच ब्रह्मांडात, जे घडते ब्रह्मांडात तेच पिंडात….
अव्याहतपणे….

–(लेखक पौराणिक संदर्भाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -