घरफिचर्सअभिनय म्हणजे चेतनेचे वैश्विक तरंग...

अभिनय म्हणजे चेतनेचे वैश्विक तरंग…

Subscribe

कच्च्या मातीला आकार देतो तो शिल्पकार. अभिनयासाठी तीच कच्ची माती होणे आणि अभिनेता अभिनेत्रीचा संकल्प असणे ही दोन सूत्रे आहेत अभिनयाच्या परकाष्ठेला पुढे नेण्यासाठी. मी अभिनय का करते हे अभिनेत्याच्या आणि अभिनेत्रींच्या डोक्यात असणे गरजेचे आहे.

तिसरी घंटा होते आणि पडदा उघडतो. रंगमंचावर नेपथ्य दिसते. नेपथ्यानंतर यांत्रिक ध्वनींचा चढउतार. अति भावुकता ते अति शून्यात जाणे. नाटकात ठराविक वेळेनंतर हास्य, एका निश्चित वेळेनंतर भावनिकता किंवा अश्रू, ठराविक वेळेनंतर टाळ्यांचा गडगडाट, तंत्रज्ञानाचे संमोहन या सगळ्यामुळे प्रेक्षक म्हणजे रसिक खुश होतात. नाटकाची समीक्षा आणि प्रसिद्धी होते … हे सारे पहिल्या अनुभवल्यानंतर माझ्या समोर प्रश्न पडतो की अभिनय म्हणजे नेमके काय? आदीकाळापासून लिहून ठेवलेल्या शास्त्रामध्ये दिलेले सूत्र किंवा काही जणांनी केलेले स्वतःवरचे प्रयोग किंवा आधुनिकतेच्या नावाखाली यांत्रिक होऊन जाणे म्हणजे अभिनय का? किंवा अभिनय म्हणजे तंत्रज्ञान आहे का? की अभिनय हा स्वतःचा शोध आहे.

स्वतःचा असा शोध जो चरित्र म्हणजेच पात्र आणि नाटकाचे मूळ ध्येय व स्वराला साधतांना मंचावर जिवंत होतो आणि केवळ मुखवटा न राहता नाटकाच्या आत्म्याला प्रेक्षकांशी जोडतो आणि हेच अभिनयाचे तत्व … एक कलाकार एका तत्वाला अभिव्यक्त करतो .. अभिनयाच्या माध्यमातून आपल्या भावना, विचार प्रकट करतो … कलाकाराचे मुक्त उन्मुक्त भाव अभिनयाला उंची देतात … मी अभिनयाला सुरुवात केली त्यावेळी एक ठोकताळे मनात होते … दिग्दर्शकाने ठरवलेल्या जागा, आणि लेखकाचे शब्द या चौकटीत अभिनय करायचा … आणि भावनात्मक पक्ष साकारायचा … चरित्र साकारण्यासाठी चरित्राला साजेशी वेशभूषा हवीच हे मानसिक जडत्व होते ….अभिनय आतून यायला हवा म्हणजे नेमके काय ? याची ओळख नव्हती … रंगभूमीवर अभिनय करताना entry exit, पाठ न दाखवणे, हातवारे करणे या स्किल develop होत होत्या … अभिनय हा कोणत्याही चौकटीत न अडकणारा आविष्कार आहे … छेडछाड क्यों या नाटकाच्या माध्यमातून अभिनयाची नव्याने जाणीव झाली … पहिलीच जाणीव म्हणजे अभिनयासाठी आवश्यक असते ते निरीक्षण … निरीक्षण आजूबाजूचे, व्यवहाराचे, सामाजिक व्यवस्थेचे, प्रसंगांचे, मानसिकतेचे, स्वभावाचे, विविध मानवीय पैलूंचे….
एक उदाहरण असे आठवते की ‘छेडछाड क्यों’ या नाटकात माझी एक भूमिका आई म्हणून होती यासाठी मी साडी नेसली कारण हाच समज होता की चरित्राला आवश्यक वेशभूषा हवी … पण थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रियेने जाणवले की वेशभूषेपेक्षा त्या चरित्राची मानसिकता, वैचारिकता परिधान करणे जास्त आवश्यक आहे …

- Advertisement -

गर्भ या नाटकाने माझ्यातील अभिनयाला एक नवीन उंची मिळाली ..गर्भ नाटक संपूर्ण आहे, ब्रह्मांड आहे. त्यामध्ये सगळे राजनैतिक वाद आहेत, पर्यावरण आहे, पृथ्वीचा गर्भापासून मानवीय गर्भापर्यंतचा प्रवास आहे … गर्भ नाटकापासून आतून अभिनय येण्याची जाणीव व्हायला लागली … मुळात अभिनय म्हणजे केवळ शब्द नाहीत तर त्या शब्दांचा अर्थ, संदर्भ, दृश्य, अदृश्य साकार करणे… या नाटकात असलेल्या वेगवेगळ्या छटा आणि सुराने माझ्यातील आवाजाला एक नवी दिशा दिली .. मुळात नाटक हे खोटे असते जे अभिनयाने आपण खरे करतो यात आवाजाचा मोठा वाटा असतो. आधी हे शिकवले गेले होते की, आवाज मोठा असावा, त्याचा throw शेवटच्या ओळीत बसणार्‍या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. पण थिएटर ऑफ रेलेवन्सने त्या आवाजाने विश्वास कसा निर्माण करावा याचे सूत्र दिले आणि आवाजाला सखोलता दिली. आपल्या आवाजात असलेला वरवरचेपणा विश्वास निर्माण नाही करत, तर माझ्या पोटातला आवाज आणि त्याला असलेली वैचारिक जोड विश्वास निर्माण करते. कच्च्या मातीला आकार देतो तो शिल्पकार. अभिनयासाठी तीच कच्ची माती होणे आणि अभिनेता अभिनेत्रीचा संकल्प असणे ही दोन सूत्रे आहेत अभिनयाच्या परकाष्ठेला पुढे नेण्यासाठी. मी अभिनय का करते हे अभिनेत्याच्या आणि अभिनेत्रींच्या डोक्यात असणे गरजेचे आहे. अभिनय म्हणजे वेळ. अभिनय म्हणजे जागा. अभिनय मानवीय चेतनेचे वैश्विक तरंग आहे … अभिनयाला भाषेची, काळाची, क्षेत्रवादाची मर्यादा नसते …

अभिनय

- Advertisement -

– मंजुल भारद्वाज

अमूर्त मूर्त का खेल है

मूर्त अमूर्त का मेल है

जिस्म रूहानी है

रूहानी जिस्म है

भाव विभोर, भाव शून्य

शून्य में तरंगित शून्य

तरंग से तरंगित शून्य

सच झूठ का रहस्य

रहस्य का झूठासच

जीवन का रंग

रंगों का जीवन

जीवन का रंगमंच

रंगमंच में जीवन

सत्ता का विद्रोह

विद्रोह की सत्ता

मौत, जीवन, मोक्ष

जन्म,मृत्य का खेला

है जीवन लीला

लीला का रंग

कल्पना का साया

समय की पाबंदी

काल की पकड़

कला का आयाम

नयनाभिराम, सौन्दर्य का अस्त्र

सौन्दर्य शास्त्र, मोहक पर सचेत

मुखौटे से अभिव्यक्त होती रूह की

सम्प्रेषणीय चैतन्य अवस्था अभिनय है !

अभिनेत्री किंवा अभिनेत्यासमोर संवाद येणे ते रंगमंचावर सादर करणे यामध्ये जी प्रक्रिया घडते तो म्हणजे अभिनय. कारण या प्रक्रियेत कलाकार अभिनयासाठी स्वतः मधल्या व्यक्तीला आवाहन करतो. मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक पायर्‍यांशी स्वतःला जोडतो. गर्भ नाटकाच्या परफॉर्मन्स नंतर समीक्षकांनी दाद दिली की नऊ रसांच्या पलीकडे दहावा रस या नाटकात, अभिनयात दिसून येतो त्यावेळी जाणवले की अभिनय नऊ रसांच्या पलीकडे जाऊ शकतो. अभिनय म्हणजे एकीकडे प्रवाही होणे, पण त्याच बरोबर संतुलित असणे. अभिनय म्हणजे vibrations कलाकार अभिनय करतो आणि त्या अभिनयातील vibrations च्या स्पर्शाने प्रेक्षकांच्या मेंदूतील तरंगांना छेडतो. हा vibrational स्पर्श मानसिक जडत्वाला छेदतो. कलाकार रंगमंचावर परफॉर्म करतो त्याचवेळी तो स्वतःला प्रेक्षकांमध्ये बसून पाहतो हा क्षण अभिनयाला उच्चतम पातळी देतो आणि हा अनुभव मी या प्रक्रियेत घेतला. गर्भची अभिनय साधना साध्य करून मी थेट परदेशात भरारी घेतली. ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर या नाटकामध्ये गायन, वादन, नृत्य आणि संवाद हे अभिनयाचे समग्र आयाम घेऊन या नाटकाचे 26 प्रयोग युरोपमध्ये प्रस्तुत केले. युरोपियन अभिनय शैलीपलिकडे भारतीय नाट्यदर्शन थिएटर ऑफ रेलेवन्सच्या तत्वानुसार अभिनयाची वेगळी प्रतिमा युरोपियन प्रेक्षकांच्या मेंदूत रुजवून आलो.

मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटक अनहद नाद unheard sounds of universe मध्ये तत्वांचा अभिनय केला. यात संघर्ष होता की तत्व कसे परफॉर्म करायचे कारण पारंपरिक पद्धतीत तत्व परफॉर्म करताना बाहेरील गोष्टींवर भर दिला जातो जसे अचानक वीज चमकते, पाऊस पडतो, निसर्गाचे चक्र बदलते. पण तत्वाला आकार नसते, रूप नसते अशावेळी तत्वाला अभिनयाच्या माध्यमातून अभिनेता अभिनेत्रीने सादर करणे हाच अभिनयाचा कलात्मक गाभा आहे. अभिनयात तत्वाची मांडणी व्यवहारिकतेने करतो आणि त्यातून तत्वाचे प्रमाण मिळते. प्रमाणातून तत्वाचे सत्व मिळते त्यावेळी तो अभिनय संपूर्ण होतो.. अभिनेता, अभिनेत्री आपल्या अभिनयाच्या जोरावर नाटकाच्या संहितेला जिवंत करतो. अभिनय करण्यासाठी संहितेचा अभ्यास, विचार, मंथन, मन करणे आवश्यक ठरते. गौतम बुद्धांचे आत्मदिपोभव म्हणजे गौतम बुद्धांच्या नाभीत ज्योत तेवताना दिसते, पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाटकामध्ये नाभी, कंठ आणि मेंदूमध्ये दीप प्रज्वलित होतो आणि समग्र प्रकिया माझ्यातल्या अभिनेत्रीच्या अभिनयाला एक व्यक्तीसोबत एक कलाकार म्हणून समृद्ध करते .. उन्मुक्त करते. हा अभिनयाचा प्रवास आम्हाला साधनेकडून सिद्धीकडे नेतो. या सिद्धीला आम्ही न्यायसंगत संविधानिक, लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी राजगती नाटकात सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति ला एका सूत्रात बांधून राजनीति चे लोककल्याणकारी स्वरूप प्रेक्षकांत रुजवले.. आणि प्रेक्षक देशाचे मालक होऊन जागे झाले आणि प्रेक्षकांचे हे जागृत होणे माझ्या आतल्या कलाकाराची खरी उन्मुक्तता आणि सार्थकता आहे .. कलात्मक साधना आहे.

अश्विनी नांदेडकर, रंगकर्मी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -