घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार ०२ एप्रिल २०२४

राशीभविष्य : मंगळवार ०२ एप्रिल २०२४

Subscribe

मेष- उतावळेपण धोकादायक ठरेल. बोलण्या-वागण्यात काळजी घ्या. वाहन जपून चालवा. घरातील खर्च वाढेल.
वृषभ- कष्टाशिवाय यश नाही याचा प्रत्यय येईल. सामाजिक कार्यात यश मिळेल. धंदा वाढेल. नोकरवर्गाची काळजी घ्या.
मिथुन- कला-क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. व्यवहारांची चर्चा करता येईल. प्रेमाच्या व्यक्तीचा सहवास मिळेल.
कर्क- सामाजिक कार्यात यश मिळेल. स्पर्धा आकर्षक होईल. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रयत्न करण्याचा फायदा होईल.
सिंह- तणावाचा परिणाम शरीरावर होईल. डोळ्यांची काळजी वाटेल. तोडून बोलू नका. रागावर ताबा ठेवा. शांत राहा.
कन्या- जागेच्या व्यवहाराची बोलणी करता येतील. वाहन जपून चालवा. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. आनंद मिळेल.
तूळ- शेजार्‍याला मदत करावी लागेल. तुमचे विचार इतरांना पटवून देत बसू नका. धंद्यात नवे काम मिळेल. तब्येत सांभाळा.
वृश्चिक- परिस्थितीचा अभ्यास करता येईल. नवीन गोष्टी शोधून काढता येतील. विचारांना चालना मिळेल. धंदा वाढेल.
धनु- तत्त्वाने वागण्याचा फार आग्रह धरू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. जुना मित्र भेटेल. कामात कष्ट करावे लागतील.
मकर- वेगवान कामाचा दिवस राहील. मित्र-परिवार भेटेल. तुमच्या मताशी इतर सहमत होतील. दिवस आनंदात जाईल.
कुंभ- व्यवसायात लाभ होईल. नोकरवर्गाला बक्षीस द्याल. घरात महत्त्वाची चर्चा करता येईल. वेळ फुकट घालवू नका.
मीन- जास्त विचार करण्यापेक्षा आहे त्या कामात लक्ष केंद्रित करा. धंदा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -