राशीभविष्य: शुक्रवार १५ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : घरातल्या व्यक्तीकडे लक्ष द्या. वाद वाढू देऊ नका. चौफेर समस्या येतील. कट ओळखता येईल. हुशार रहा.

वृषभ : तुमच्या कामात अडथळे येतील. अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नोकरीत सावध रहा.

मिथुन : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. स्पर्धेत चमकाल. पदाधिकार मिळण्याची शक्यता वाढेल.

कर्क : महत्त्वाची कामे करा. जवळच्या व्यक्तीच्या प्रगतीची खबर मिळेल. धंदा वाढवा.

सिंह : तुमची प्रतिष्ठा वाढेल असे कार्य हातून होईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धी मिळेल.

कन्या : तुमच्या धंद्यात वाढ होईल. जवळचे लोक तुमची स्तुती करतील. वाटाघाटीत फायदा होईल.

तुला : मनावरील एखादे दडपण कमी होईल. कला क्षेत्रात कल्पना कृतीत उतरवता येईल.

वृश्चिक : आळस करू नका. महत्त्वाची कामे वेळच्या वेळी करा. मौल्यवान कागद, वस्तू नीट ठेवा.

धनु : तुम्हाला अपेक्षित असलेले काम करता येईल. मनाची एकाग्रता होईल. कल्पना सुचेल.

मकर : तुमच्यासाठी प्रयत्न करणारा माणूस महत्त्वाचा ठरेल. पदाधिकार मिळेल. लोकप्रियता मिळेल.

कुंभ : हळुहळू तुमची कामे होतील. नोकरीत लक्ष द्या. वरिष्ठांची मर्जी राखता येईल.

मीन : घरगुती कामे करण्यात अडचणी येतील. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. वाहन नीट चालवा