घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार १५ मार्च २०२४

राशीभविष्य : शुक्रवार १५ मार्च २०२४

Subscribe

मेष – घरात तणाव वाढेल. संघर्ष होईल. रागावर ताबा ठेवा. शांततेतून मार्ग काढा. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल.
वृषभ – मुलाच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. प्रवास घडेल. धंद्यात लाभ होईल. नोकरवर्गाला बक्षीस मिळेल. कायदा पाळा.
मिथुन – आत्मविश्वासाने तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण कराल. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क – धंद्यातील अडचणी कमी होतील. जीवनसाथीच्या मदतीने प्रगतीची शिडी चढता येईल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल.
सिंहः- सामाजिक कार्यात तडजोड करण्याचा उपयोग झाला असे वाटेल. कामात वरिष्ठांशी चर्चा करता येईल. धंदा वाढेल.
कन्या – मनावरील ताण कमी होईल. ठरवलेल्या कामाला वेळ देता येईल. पाहुणे येतील. त्यांच्यासोबत वेळ मजेत जाईल.
तूळ – मनाचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. आरोप सहन करावा लागेल. शांत राहा. संयम बाळगा. कठोर बोलणे टाळा.
वृश्चिक – विचारांना योग्य दिशेने नेण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. यश मिळेल.
धनु – अनुकूल परिस्थितीचा फायदा करून घेता येईल. वरिष्ठांना तुमचे विचार उल्लेखनीय वाटतील. घर-जमीन खरेदी होईल.
मकर – धडाडीने एखादा निर्णय घेऊन टाकावा अशी तुमची भावना तयार होईल. सामाजिक कार्यात तुमचे कौतुक होईल.
कुंभ – प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. रस्त्याने चालताना काळजी घ्या. कोर्ट केस लांबणीवर पडेल.
मीन – सामाजिक कार्य करताना खंबीरपणे एखादे काम कराल. उत्साह वाढेल. धंद्यात लाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -