राशीभविष्य: गुरुवार २४ नोव्हेंबर २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : तुमचा प्रभाव राजकीय-सामाजिक क्षेत्रात वाढेल. धंदा वाढेल. थकबाकी वसूल करा. मित्र कामासाठी येतील.

वृषभ : नोकरीत तणाव होईल. रागाच्या भरात नोकरी सोडू नका. आत्मविश्वास वाढेल. वाहन जपून चालवा.

मिथुन : नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.

कर्क : कठोर शब्दात बोलू नका. धंद्यात तडजोड करावी लागेल. नोकरी सोडू नका. टिकवून ठेवा.

सिंह : तुमचा प्रभाव वाढेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल. थकबाकी मिळवा. खंबीरपणा दिसेल.

कन्या : तुमचा विचार पटवणे थोडे अडचणीचे ठरू शकते. प्रेमाने वागा. यश मिळेल. धंद्यात हिशोब नीट करा.

तूळ : अपेक्षित कामे होतील. स्पर्धा जिंकाल, मैत्री होईल. सर्वांच्या विचारांचा आदर केल्याने तुम्ही प्रसिद्ध व्हाल.

वृश्चिक : छोटीशी चूक होऊ शकते. खर्च वाढेल. पैसे जपून ठेवा. अरेरावीची भाषा वाद तयार करेल.

धनु : तुमचा आत्मविश्वास वाढेल. अंदाज बरोबर येईल. महत्त्वाचा निर्णय आज घ्या. काम करून घ्या.

मकर : तुमचा राग वाढू देऊ नका. धंदा मिळेल. फायदा होणारे काम मिळेल. थकबाकी वसूल करा.

कुंभ : तुमच्या विचारांना चालना मिळेल. प्रेम करणारी व्यक्ती सहवासात येईल. स्पर्धा जिंकाल.

मीन : कर्तव्याचे पालन करा. वाहन जपून चालवा. धंद्यात नुकसान होईल, सावधपणे बोला.