घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार १८ एप्रिल २०२४

राशीभविष्य : गुरुवार १८ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – सामाजिक कार्यात यश मिळेल. घरातील समस्या सुटेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंद्यात वाढ होईल.
वृषभ – कामात अधिकाराचा वापर करता येईल. आर्थिक लाभ होईल. आप्तेष्ठांच्या कार्यात मदत कराल. तब्येत उत्तम राहील.
मिथुन – मागील थकबाकी लवकर वसूल करा. प्रसिद्धीपेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा वाटेल. प्रेमात यश मिळेल.
कर्क – घरात आशादायक वातावरण राहील. बोलण्यात गर्विष्ठपणा आणू नका. धंद्यात सुधारणा व वाढ होईल.
सिंह – मनाची चंचलता वाढेल. शत्रूच्या गुप्त कारवाया समजतील. सामाजिक कार्यात प्रलिद्धी मिळेल. धंदा तेजीत चालेल.
कन्या – आत्मविश्वासाच्या बळावर अवघड काम करून दाखवाल. प्रेमाच्या व्यक्तीला सांभाळून घ्यावे लागेल.
तूळ – अपेक्षा वाढतील. कामात उत्साह वाढेल. तुमची स्पर्धा फारच रंजक ठरेल. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याचा प्रयत्न करता येईल.
वृश्चिक – ठरविलेले काम वेळेवर पूर्ण करता येईल. धंद्यात लाभ होईल. प्रेमाची भाषा वापरावी लागेल. कोर्टकेस जिंकाल.
धनु – दुसर्‍याशी स्पर्धा करण्यापेक्षा ध्येयावर लक्ष द्यावे. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. प्रेमात यश मिळेल.
मकर – जीवनसाथीच्या शब्दाला किंमत द्यावी लागेल. फायदा होईल. घरातील खर्च वाढेल. मुलांच्या प्रगतीचा विचार कराल.
कुंभ – वाहन जपून चालवा. कोर्टकेसमध्ये फसगतीपासून सावध राहा. मदतीची अपेक्षा ठेवू नका. स्वतःच विचार करा.
मीन – कामात आप्तेष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. मोठी खरेदी कराल. चांगले संबंध वाढतील. वरिष्ठांशी चर्चा सफल होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -