घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार १६ एप्रिल २०२४

राशीभविष्य : मंगळवार १६ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकता. सामाजिक कार्यामुळे जीवनाला कलाटणी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.
वृषभ – धंद्यातील त्रुटी लक्षात येतील. मनातील संभ्रम कमी होईल. अडचणी कमी होतील. नोकरवर्ग धंद्यात मदत करेल.
मिथुन – घरातील प्रश्नांमुळे मनाची द्विधा अवस्था होईल. जीवनाचा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात नवे काम मिळेल.
कर्क – चांगले काम केल्याने वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रवास घडेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. तब्येत सांभाळा.
सिंह – दूर गेलेल्या व्यक्तीची पुन्हा नव्याने ओळख होण्याची शक्यता आहे. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंदा वाढेल.
कन्या – सामाजिक कार्यात आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. आप्तेष्ठांची मदत होईल. प्रेमातील तणाव कमी होईल.
तूळ – संततीचे मन आनंदी पाहून उत्साह वाढेल. त्यांच्यासाठी मोठी खरेदी होईल. प्रवासाचा आनंद मिळेल.
वृश्चिक – शेअर्समध्ये अधिक लाभ संभवतो. कामात आळस करू नका. आजचे काम आजच करा. तब्येत उत्तम राहील.
धनु – घरगुती समस्या सुटल्याचे समाधान मिळेल. प्रवास होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. दिवस आनंदात जाईल.
मकर – कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नावलौकिक वाढेल. धंद्यात नोकरवर्गाचे पूर्ण सहकार्य मिळेल. नफा होईल.
कुंभ – घरातील प्रश्नांवर तोडगा शोधता येईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. वाहन-घर खरेदीचा विचार करता येईल.
मीन – सामाजिक कार्यात लोकांचे प्रश्न मार्गी लावा. प्रामाणिकपणे कामे करा. कला-क्रीडा क्षेत्रात नाव कमवाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -