घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार २० फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : मंगळवार २० फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – कामातील विरोध सहन करा. राग आवरा. शांत राहून मार्ग काढा. धंद्यात नवे काम मिळेल. तब्येत उत्तम राहील.

वृषभ – ठरवलेली कामे मार्गी लागतील. आनंदाची बातमी कळेल. प्रवासात वाहन जपून चालवा. कोणतेच व्यसन करू नका.

- Advertisement -

मिथुन – कामातील समस्यांचा विचार दोन्ही बाजूने करता येईल. तुमचे महत्त्व वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात यश मिळेल.

कर्क – घरात तुमच्याबद्दल झालेला गैरसमज दूर होऊ शकेल. प्रयत्नाने समस्या सोडवा. अहंकाराने नाही.

- Advertisement -

सिंह – धंद्यात शांत डोक्याने विचार करा. जमिनीसंबंधी कामे करून घ्या. थकबाकी मिळेल. व्यसन करू नका.

कन्या – मन स्थिर ठेवा. अनेकांचे विचार ऐकून घ्या. तुमच्यावर असलेला दबाव कमी होईल. कोर्टकेस यशस्वी होईल.

तूळ – कामात नकळत एखादी चूक होऊ शकते. तुम्ही सावध राहा. तुमची समस्या सोडवण्यास मित्रांची मदत मिळेल.

वृश्चिक – घरातील विरोधाचा सामना करता येईल. जवळच्या मोठ्या लोकांना समजून घ्या. कुणालाही कमी समजू नका.

धनु – कोर्टाच्या कामात यश मिळेल. कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामात मोठे लोक मदत करतील. तब्येत सांभाळा.

मकर – तुमच्यावर प्रेम करणारे लोक जवळ राहतील. तुमचे वर्चस्व राहील. सामाजिक कार्य चालू ठेवा. धंद्यात यश मिळेल.

कुंभ – घरातील समस्यांमुळे रागाचा पारा वाढू देऊ नका. शांत राहा. कोर्टकेस सुटण्यास वेळ लागेल. प्रवासात घाई करू नका.

मीन – तुमच्या कामाला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल. मानप्रतिष्ठा मिळेल. तुमचा फायदा होईल. नोकरीत यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -