घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार १४ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : बुधवार १४ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – फायदेशीर मुद्दे वाटाघाटीत मांडता येतील. तुमचे महत्त्व वाढेल. आत्मविश्वासाने काम कराल. धंदा वाढेल.
वृषभ ः- धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल. तुम्ही सावधपणे मैत्री करा.
मिथुन ः- तुमची प्रतिष्ठा पणाला लावूनही मनाप्रमाणे वाटाघाटी होणे कठीण आहे. धंद्यात लक्ष द्या. रागावर ताबा ठेवा.
कर्क ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. तुमचे महत्त्व वाढेल. गैरकामे करू नका.
सिंह ः- धंद्यात नवी प्रेरणा देणारी घटना घडेल. जुने मित्र भेटतील. वाटाघाटीची चर्चा सफल होईल.
कन्या ः- जवळच्या लोकांना सांभाळून ठेवा. घरगुती प्रश्न सोडवता येईल. तुमची किंमत सर्वांना कळून येईल.
तूळ ः- मनावर प्रतिष्ठेचे दडपण येऊ शकते. तुमची किंमत वाढेल. मित्राला मदत करणे जास्त महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक ः- तुमच्यावर लोकांनी अधिक विश्वास ठेवावयास हवा होता असे वाटेल. प्रतिष्ठा टिकून राहील.
धनु ः- घरगुती वाद होईल. प्रवासात सावध राहा. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. प्रेमाची माणसे भेटतील.
मकर ः- विरोधक तुमच्या पुढे नमते धोरण घेतील. मैत्री वाढेल. धंद्यात वाढ करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ ः- किरकोळ वाद निर्माण होईल. धंद्यात फायदा होईल. मुले नाराज होण्याची शक्यता आहे.
मीन ः- धंद्यात धडाडीने मेहनत घ्या. फायदा होईल. चौफेर प्रगती होईल. प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -