घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार १५ एप्रिल २०२४

राशीभविष्य : सोमवार १५ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – सामाजिक कार्यात यश मिळेल. लोकांची कामे मार्गी लावा. मनाप्रमाणे कार्यक्रम ठरवता येईल. मानसिक ताण कमी होईल.

वृषभ – कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकिक वाढेल. अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. धंदा वाधेल.

- Advertisement -

मिथुन – घरातील समस्यांमुळे मन उदास राहील. कामाची गती मंदावेल. सहकारी मदत करतील. खर्च वाढेल. तब्येत सांभाळा.

कर्क – राजकीय क्षेत्रात जबाबदारी स्वीकारावी लागेल. मनाची एकाग्रता होईल. नवीन परिचय होईल. दिवस आनंदात जाईल.

- Advertisement -

सिंह – मुलांचा आधार महत्त्वाचा वाटेल. त्यांची प्रगती पाहून तुम्हाला धन्यता वाटेल. प्रयत्नाचा उपयोग होईल. यश मिळेल.

कन्या – योग्य व्यक्तीची निवड करता येईल. चांगले संबंध अधिक दृढ होतील. घरातील प्रश्नाचे उत्तर मिळेल.

तूळ – आर्थिक देव-घेवीत सावध राहा. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार कराल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृश्चिक – मनाला उभारी देणारी घटना घडेल. मनाची शक्ती वाढवता येईल. व्यवसायात लाभ होईल. कोर्ट केस जिंकाल.

धनु – शेजारी तुमच्यावर आरोप करण्याची शक्यता आहे. नियमांना महत्त्व द्यावे लागेल. चांगले काम केल्याने वरिष्ठांकडून कौतुक होईल.

मकर – घरगुती कार्यक्रमात मन रमेल. धंद्यात नवे काम मिळेल. प्रवासात आनंद मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल.

कुंभ – घरातील खर्चाचा अंदाज चुकेल. प्रवासात क्षुल्लक तणाव संभवतो. कायद्याला कमी लेखू नका. राजकीय क्षेत्र गाजेल.

मीन – महत्त्वाचे काम आजच करा. सामाजिक कार्यात लोकांची कामे पूर्ण करा. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -