घरIPL 2020RCB vs SRH: हैदराबादच्या विजयामुळे प्ले ऑफची चुरस वाढली; ६ संघ आता...

RCB vs SRH: हैदराबादच्या विजयामुळे प्ले ऑफची चुरस वाढली; ६ संघ आता गॅसवर

Subscribe

रॉयल चँलेज बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद संघामध्ये शारजाहच्या मैदानावर IPL 2020 चा ५२ सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर ५ विकेट आणि ३५ चेंडू राखत दणदणीत विजय मिळवल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. आता मुंबई इंडियन्स वगळता सहा संघाकडे १२ गुण आहेत. सर्वांना १४ गुण मिळवण्यासाठी शेवटचा सामना मोठ्या फरकाने म्हणजेच रन रेटने जिंकणे आवश्यक आहे. हैदराबाद संघाचा रन रेट बेरजेत आहे. बाकी सर्व संघाचे रन रेट नकारात्मक आहेत. त्यामुळे आता पुढील चार सामने अतिशय चुरशीचे आणि आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे भविष्य ठरविणारे होणार आहेत.

Ipl 2020 points table

- Advertisement -

हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हैदराबादच्या गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केवळ १२० धावांवर रोखले. संदीप शर्मा, जेसन होल्डरने अचूक मारा करत बंगळुरुच्या फलंदाजांना वर मान करु दिली नाही. आरसीबीकडून ओपनर जोश फिलिफला ३२ धावा करत आल्या. तर एबी डिव्हिलियर्सने २४, वॉशिग्टंन सुंदरने २१ तर गुरकिरत सिंहने १५ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पड्डिकल या सामन्यात ७ आणि ५ धावा करुन अनुक्रमे बाद झाले. त्यामुळे कसेबसे १२० धावा बंगळुरुला करता आल्या.

हैदराबादची सुरुवात देखील थोडीशी अडखळत झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आज काही कमाल दाखवू शकला नाही. ८ धावा करुन तो वॉशिग्टंन सुंदरचा बळी ठरला. मात्र त्यानंतर वृद्धिमान साहा आणि मनिष पांडे यांनी ५० धावांची जलद भागीदारी केली. साहा ३९ तर मनिषने २६ धावा केल्या. त्यानंतर केन विल्यिम्सन आणि अभिषेक शर्मा ताबडतोब बाद झाले. त्यामुळे काही काळ RCB च्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र जेसन होल्डरने केवळ १० चेंडूत ३ षटकार आणि चौकार ठोकत ताबडतोब २६ धावा करत सामना संपवून टाकला. त्यामुळे हैदराबादच्या रनरेटमध्येही वाढ झाली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -