घरलोकसभा २०१९सत्तेची खुर्ची काय संगीत खुर्ची आहे का? - उद्धव ठाकरे

सत्तेची खुर्ची काय संगीत खुर्ची आहे का? – उद्धव ठाकरे

Subscribe

लोकसभा निवडणुकांचा ज्वर आता राज्यात चढायला सुरुवात झाली असून त्यादरम्यान शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सेना-भाजपच्या युतीची पाठराखण करतानाच महाआघाडीवर टीका केली. ‘आम्ही एका विचारानं एकत्र आलो आहोत. पण मी या महाआघाडीला विचारतो, ज्यांचं एकमेकांशी पटत नाही, अशी लोकं एकत्र कशी येतात?’ असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर, विशेषत: देशद्रोहाच्या मुद्द्यावर टीका केली.


हेही वाचा – आज हिंदुत्वाचा गजर आणि नंतर विसर आता तरी होऊ नये – उद्धव ठाकरे

काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचा मुद्दा समाविष्ट केला आहे. पण जो कुणी देशद्रोहाचा गुन्हा करेल, त्याला आम्ही फासावर लटकवणारच’, असं ते यावेळी म्हणाले. तसेच, अनेक पक्षांच्या महाआघाडीवर देखील त्यांनी टीका केली. ‘आमच्याकडे एक नाव आहे. काल, आज आणि उद्याही नरेंद्र मोदीच आमचे उमेदवार असतील. तुम्ही एक कुठलंतरी नाव सांगा. कधी ममता बॅनर्जी पंतप्रधान होतील, कधी मायावती होतील, कधी राहुल गांधी होतील तर कधी असदुद्दीन ओवैसीसुद्धा होतील’, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -