घरमहा @२८८मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १७१

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७१

Subscribe

मानखुर्द-शिवाजीनगर (विधानसभा क्र. १७१) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातला मानखुर्द-शिवाजीनगर हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. उत्तर-पूर्वमधल्या इतर मतदारसंघांच्या तुलनेत मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये गरीब आणि निम्न-मध्यमवर्गीय मतदारांचं प्रमाण मोठं आहे. प्रामुख्याने मुस्लीम मतदार आणि अनधिकृत बांधकाम-झोपड्यांमध्ये राहणारी जनता ही या मतदारसंघाची ओळखच झाली आहे. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम असल्यामुळे इथल्या नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केलं आहे. तसंच, डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा अजूनही सुटू शकलेला नाही. या मतदारसंघात ३१३ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,८३,२४७
महिला – १,२६,१७२

- Advertisement -

एकूण मतदार – ३,०९,४१९


Abu Azmi
अबू आजमी

विद्यमान आमदार – अबू आजमी, समाजवादी पार्टी

समाजवादी पक्षाचा मुंबईतील चेहरा म्हणून अबू आजमी यांच्याकडे पाहिलं जातं. याआधी २००२मध्ये त्यांनी सपाचे राज्यसभा सदस्य म्हणून देखील काम केलं आहे. २००९मध्ये मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या दोन मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. तर २०१४मध्ये पुन्हा मानखुर्द-शिवाजीनगरमधून ते निवडून आले. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अबू आजमी कायम चर्चेत आणि वादातही सापडले आहेत.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अबू आझमी, सपा – ४१,७१९
२) सुरेश पाटील, शिवसेना – ३१,७८२
३) अब्राहनी युसूफ, काँग्रेस – २७,४९४
४) राजेंद्र वाघमारे, राष्ट्रवादी – ५६३२
५) अल्ताफ काजी, एमआयएम – ४५०५

नोटा – १३३८

मतदानाची टक्केवारी – ४१.३३ %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -